
भोंदूबाबा म्हणाला; अंगात शिरले भूत अन् केला लैंगिक अत्याचार…
सातारा : शाळकरी मुलीच्या अंगात भूत शिरल्याची बतावणी करत जादूटोणा करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी, आरोपी भोंदूबाबाला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
याप्रकरणी संशयित आरोपी सौरभ नाना मदने याच्याविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताने पीडितेच्या अंगातील भूत काढण्याच्या बहाण्याने बाहुली, लिंबू आणि चामडी गोफणीचा वापर करून अघोरी विधी केले असून त्यानंतर तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून फलटण शहर पोलिस ठाण्यात पोस्को कायदा आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फास्टट्रॅक कोर्टात हा गुना चालवून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले.
View this post on Instagram
दरम्यान, पीडितीच्या घराबाहेर आघोरी विद्या करून लिंबू आणि जिवे मारण्याची धमकीच पत्र ठेवल्यामुळे कुटुंब भयभीत झाले आहेत. पोलिस प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील पीडित त्यांच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे.
लातूरमध्ये भोंदूबाबचे कांड; आई-वडीलांना बसवलं घराबाहेर अन् आतमध्ये शारीरिक संबंध…
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला अन् विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ; गुंगीचे औषध आणि छुपे कॅमेरे…
भोंदूबाबाने पतीला बाहेर पाठवलं अन् पत्नीसोबत नको ते केलं…
पुणे! भोंदूबाबावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप; मुलींना मांडीवर बसवतो…
भोंदू राजेंद्र गडगे याच्याकडे निघाले 200 व्हिडीओ अन् 90 गोळ्या…

