सहवैमानिकाच्या हल्ल्यामुळे कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कवटीला झालेल्या फ्रॅक्चरवर सौदी अरेबियात शस्त्रक्रिया…

अबू धाबीः दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानावरील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले शूर वैमानिक कॅप्टन स्मिथ यांच्या प्रकृतीबाबत नवीन खुलासे समोर आले आहेत. ओमानचा सहवैमानिक हम्मामी याने कॅप्टन स्मित यांच्या डोक्यावर प्रहार केला होता, ज्यामुळे त्यांच्या कवटीला तडा गेला होता. हल्ल्यादरम्यान कॅप्टन स्मित यांच्या हाडाला ‘डिप्रेस्ड फ्रॅक्चर’ झाले होते आणि सौदी अरेबियामध्ये त्याच्यावर तातडीचे उपचार […]

अधिक वाचा...

लोणावळ्यातील अभय मराठे मृत्यू प्रकरणाला खुनाचे वळण; आजोबांनीच झाडल्या नातवावर गोळ्या…

पुणे : लोणावळ्यात जमिनीच्या वादातून आजोबांनीच नातवाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे अभय मराठे मृत्यू प्रकरणाला खुनाचे वळण मिळाले आहे. आजोबांसह 5 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळ्यातील भुशी गावात अभय मराठे यांचा सुरुवातीला रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटल्याने दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली होती. मात्र, […]

अधिक वाचा...

गाझावरील इस्रायली हल्ल्याचा बदला घेण्यासाठी फ्लायदुबईच्या सहवैमानिकाने रचला विमान अपघाताचा कट…

तेल अवीव: फ्लायदुबई कंपनीत नोकरी मिळण्यापूर्वीच हमाम अल हम्मामी याने, इस्रायलमधील बेन गुरियन विमानतळावर विमान धडकवण्याची योजना आखली होती. संयुक्त अरब अमिरातीचे सुरक्षा अधिकारी हम्मामी याची चौकशी करत आहे. या चौकशीशी संबंधित असलेल्या दोन इस्रायली अधिकाऱ्यांचा हवाला देत ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने हे वृत्त दिले आहे. इस्रायलची ‘शिन बेट’ या सुरक्षा संस्थेने गेल्या आठवड्यात विमानावर […]

अधिक वाचा...

गाझियाबादमध्ये स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलांच्या समोर पत्नीला मारहाण करून पतीने केली हत्या…

गाझियाबादः येथील सदापूर परिसरात रविवारी घरगुती वादातून एका महिलेला (वय ३५) तिच्या पतीने मारहाण करून ठार केल्याची माहिती, पोलिसांनी दिली. ही घटना त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांसमोर घडल्याचे सांगण्यात येत आहे. रेणू सिंग नावाच्या महिलेला तिच्या पतीने (वय ३८) वादादरम्यान मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंतर तिला तिच्या सासरच्या मंडळींनी रुग्णालयात नेले, जिथे उपचारादरम्यान […]

अधिक वाचा...

नाशिक! प्राध्यापिकेचे अश्लील व्हिडिओ विद्यार्थ्याने केले स्क्रीन रेकॉर्ड अन्…

नाशिक: एका प्रसिद्ध महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिचे अश्लील व्हिडिओ तयार करून ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित माजी विद्यार्थ्याविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन ओढे (राठोड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित चेतन याने पीडित प्राध्यापिकेला आधी आपल्या […]

अधिक वाचा...

पूर्णेकर प्रकरणात धक्कादायक पुरावे हाती! पोलिसांनी पप्याला उघडं पाडलं; १५० फोन कॉल्स अन् गोव्याचा प्लॅन…

ठाणे: शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्याकांडाच्या तपासात पोलिस यंत्रणेला अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. मुख्य सूत्रधार सुभाष उर्फ पप्या शिंदे असल्याचे तपासात समोर आले आहे. आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा करणारा पप्या शिंदे आता या प्रकरणात पुरता अडकला आहे. प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी […]

अधिक वाचा...

सातारा! शिक्षक असलेल्या बापाने मुलीला संपवलं अन् AI ला विचारलं…

सातारा: एका शिक्षकाने आपल्या पोटच्या मुलीच्या डोक्यात रागाच्या भरात बॅट घालून तिची हत्या केल्याचा धक्कादायक घटना गोडोली येथे घडली आहे. आपल्या हातून मुलीची हत्या झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने 112 क्रमांकावर कॉल करुन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी गेले होते. त्याठिकाणी पाहणी केल्यानंतर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी कसून तपास केल्यानंतर पुरुषोत्तम कदम यानेच आपल्या […]

अधिक वाचा...

फ्लायदुबईच्या सहवैमानिकाने जुलैमध्येच आखली होती इस्राएलवर हल्ल्याची योजना…

अबू धाबी: तेल अवीवला जाणारे विमान पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या फ्लायदुबईच्या सहवैमानिकाने इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर, विमान धडकवण्याची योजना आखली होती. अटकेत असलेल्या ओमानचा दहशतवादी सहवैमानिक हमाम अल-हम्मामी याने संयुक्त अरब अमिरातीच्या तपास अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, विमानाचे कॅप्टन स्मित मच्छार यांची हत्या करून, संशय निर्माण होऊ न देता विमान उतरविण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या मिळवायच्या आणि फ्लायदुबई […]

अधिक वाचा...

महात्मा गांधींची प्रतिमा असलेली नोट आक्षेपार्ह पद्धतीने हाताळण्याची रील पोस्ट केल्याबद्दल सुरतच्या महिलेस अटक…

सुरतः महात्मा गांधी यांचे चित्र असलेली ५०० रुपयांची नोट आक्षेपार्ह पद्धतीने हाताळलेली एक ‘रील’ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याच्या आरोपावरून, गुजरातमधील सुरतमध्ये एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेची ओळख सिमरन पटेल (वय ४७) अशी पटली असून, तिचे इन्स्टाग्रामवर दहा लाख फॉलोअर्स आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती शहरातील अडजान परिसरात राहाते आणि तिने गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला, […]

अधिक वाचा...

बलात्कार करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईची दहशत आवश्यक – सर्वोच्च न्यायालय…

नवी दिल्लीः बलात्कार करणाऱ्या समाजकंटकांच्या मनात कठोर कारवाईची भीती निर्माण झाली पाहिजे. असे कृत्य केल्यास आपल्याला ठार मारले जाऊ शकले, अशी दहशत त्यांना वाटली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना उद्देशून कडक शब्द वापरले आहेत. न्यायालयाने या बलात्कार प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. सुनावणी दरम्यान दिल्लीचे पोलिस आयुक्त अनुराग […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!