
हृदयद्रावक! राहुरीत आईने दोन चिमुकल्यांसह संपवली जीवनयात्रा…
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह जीवनयात्रा संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव वंदना गणेश गाडे (वय ३३) असे असून, तिच्यासोबत चैतन्य आणि जीवन या दोन चिमुकल्यांचाही मृत्यू झाला आहे. कौटुंबिक वाद आणि पतीकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून वंदना यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये पतीच्या त्रासाचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे.
View this post on Instagram
राहुरी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. शवविच्छेदनानंतर आणि सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी पती गणेश गाडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे देवळाली प्रवरा गावात शोककळा पसरली असून, दोन निष्पाप चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
लोणावळ्यातील अभय मराठे मृत्यू प्रकरणाला खुनाचे वळण; आजोबांनीच झाडल्या नातवावर गोळ्या…
नाशिक! प्राध्यापिकेचे अश्लील व्हिडिओ विद्यार्थ्याने केले स्क्रीन रेकॉर्ड अन्…
हृदयद्रावक! पैठणमध्ये भीषण अपघात बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू…
ह.भ.प महाराजावर लैंगिक शोषणचा गुन्हा दाखल होताच झाला फरार…
हृदयद्रावक! गर्भवती महिलेचा मृत्यू अन् बाळही दगावलं; कारण…

