पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीकडून पकडल्या ११ मोटारी; पाहा क्रमांक…

पुणे (सुनिल सांबारे): आंतरराज्यीय टोळीकडून दिल्ली येथील चोरीच्या चारचाकी गाडयांची महाराष्ट्रात बनावट कागदपत्रांव्दारे विक्री करणाऱ्या टोळीला दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. पिंपरी-चिंचवडच्या दरोडा विरोधी पथकाने आरोपींकडून १,५७,००,००० रुपये किंमतीच्या ११ चार चाकी गाडया हस्तगत केल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे हददीतील वाहन चोरीच्या अनुषंगाने वरीष्ठांचे आदेशाने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढत होते. स.पो.फौ. महेश खांडे व पोलिस हवा नितीन लोखंडे यांना त्यांचे बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून ०५/०१/२०२४ रोजी हिंजवडी परिसरातून चाकण पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. १०५९/२०२१ भा.द.वि. कलम ३७९ मधील चोरीस गेलेल्या इको गाडीसह सातारा जिल्हयातील पोलिस रेकॉर्डवरील वाहनचोर अजीम पठाण यास त्याचा साथीदार शशीकांत काकडे याचेसह आणखी एका चोरीच्या ब्रेझा गाडीसह ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे केलेल्या तपासात सदर आरोपींकडे मिळून आलेल्या गाडया व्यतिरिक्त त्यांनी अनेक चोरीच्या गाड्यांचे व्यवहार केल्याचे निष्पन्न होत असल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना कळविल्यावर त्यांनी सदर गुन्हा दरोडा विरोधी पथकाकडे वर्ग करून सखोल तपास करण्याचे आदेश दिले. चाकण पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. १०५९/२०२१ भा.द.वि. कलम ३७९ या गुन्हयाचा तपास दरोडा विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. दाखल गुन्हयाचे सखोल तपासादरम्यान आरोपी १. अजीम सलीम पठाण (वय ३४ वर्षे, मु.पो रहीमतपुर मेन रोड, बाजारपेठ महाराष्ट्र बॅके शेजारी, ता कोरेगाव, जि. सातारा), २. शशिकांत प्रताष काकडे (वय ३० वर्षे, रा. मु.पो साखरवाडी (पिंपळवाडी), ता फलटण जि. सातारा) या दोघांनी मिळून आपल्या आंतरराज्य गुन्हेगारी टोळीच्या मदतीने परराज्यातून चोरुन आणलेल्या पुढील प्रमाणे चार चाकी गाडया जप्त करण्यात आल्या आहेत.

गाडी क्र व गाडीचा प्रकार :
एच आर ०६ ए वाय ४२४५ – सेल्टॉस पांढरा रंग
डी एल ०१ सी ए बी ८२९१ – ब्रेझा सिल्व्हर रंग
के ए १३ झेड ५८५५ – इको सिल्व्हर
एम. एच १४ जे एम ८६५० – इको सिल्व्हर
डी एल ८ सी बी एफ ६३४५ – आय २०
एच आर ८० डी १५८२ – क्रेटा काळ्या रंग
आर जे ३४ सी बी ३४३४ – क्रेटा पांढरा रंग
युपी १६ सी एच ६७४२ – ब्रेझा पांढरा रंग
डी एल १ सी ए सी ६३०७ – क्रेटा पांढरा रंग
एम पी ०७ सी एच ६५२९ – क्रेटा पांढरा रंग
एच आर २६ डी के ९१३२ – इनोव्हा

आरोपींकडून अशा एकूण ०१ कोटी ५७ लाख रु च्या ११ चार चाकी गाडया आरोपीकडुन जप्त करण्यात आलेल्या आहेत व आणखी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. वरील दोन आरोपी सोबत
३. राजाराम उर्फ राजु तुकाराम खेडेकर वय ३४ वर्षे रा. पटवर्धन कुरोली, ता. पंढरपुर, जि. सोलापुर
४ महेश भिमाशंकर सासवे वय ३१ वर्षे, रा १६९ राघवेद्रनगर, विजापुर रोड, सोलापुर याना अटक करुन
५. प्रशांत माने रा रहीमतपुर
६ विकास माने रहीमतपुर
७. भरत खोडकर रा सांगली
८. हाफिज रा मेरठ उत्तर प्रदेश ९. इलियास रा बेंगलोर १० रसुल शेख रा. इचलकरंजी अशी आंतरराज्यीय वाहन चोरांची टोळी
निष्पन्न करण्यात आलेली आहे. तसेच यातील भरत खोडकर हा सांगली जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाई पदावर कार्यरत आहे.

आरोपी महेश सासवे यास ताब्यात घेतेवेळी त्याचे अंगझडती मध्ये ५००/- रू दराच्या ०२ बनावट चलनी नोटा मिळून आल्या असून त्याबाबत आरोपीवर बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी नवीन गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आरोपी अजिम पठाण यास सन २०२३ मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सातारा जिल्हा यांनी अटक करून त्याचेकडून अशाच प्रकारे ०९ चार चाकी गाडया जप्त करण्यात आल्या होत्या. आरोपी अजीम पठाण हा दिल्ली येथे विमानाने प्रवास करीत जात असे व तेथे आपल्या सहकाऱ्यांचे मदतीने वाहन चोरी करुन महाराष्ट्रात कमी किमतीत वाहने विकी करीत असे त्यासाठी खरेदी करणाऱ्यांना बनावट कागदपत्रे देत होता.

सदर उल्लेखनीय कामगिरी ही पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, डॉ. संजय शिंदे सह पोलिस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलिस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे १, सहा पोलिस आयुक्त सतीश माने, गुन्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक पोलिस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलिस उप-निरीक्षक भरत गोसावी, पोलिस अंमलदार महेश खांडे, औंदुबर रोंगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, राहूल खारगे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, आशिष बनकर, प्रवीण माने, सागर शेडगे, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, अमर कदम, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, समीर रासकर, चिंतामण सुपे, पो हवा माळी व पोशि हुलगे तांत्रिक विश्लेषण विभाग यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपींना भोसरी पोलिसांनी केले जेरबंद…

पिंपरी-चिंचवडमध्ये युनिट-४ कडून १४ गुन्हे उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

पिंपरी-चिंचवडमध्ये पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीचे कारनामे…

पिंपरी-चिंचवडमध्ये दहशतवाद विरोधी शाखेची मोठी कारवाई…

पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या लागलेल्या आगीत सात महिलांचा मृत्यू….

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!