पांढऱ्या रसगुल्ल्यांचा ‘काळा’ धंदा; संभलमध्ये छाप्यात साडेचार हजार किलो भेसळयुक्त मिठाई…

संभलः महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर चालू केलेल्या धडक कारवाईचा प्रभाव देशभर पडू लागला आहे. उत्तर प्रदेशच्या संभल तालुक्यातील मंगनपूरच्या सरपंचाच्या मालकीचा आणि त्यांच्याच घराजवळ असलेल्या कारखान्यात बनवल्या जाणाऱ्या, पांढऱ्या रसगुल्ल्यांच्या गुणवत्तेच्या तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे. मेरठ येथील अन्न सुरक्षा विभागाच्या प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत जप्त केलेले पांढरे रसगुल्ले निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे. यासोबतच, रसगुल्ले बनवण्यासाठी वापरण्यात येणारे पनीर आणि मक्याचे स्टार्च देखील विहित गुणवत्ता मानकांची पूर्तता करत नव्हते. अहवाल समोर आल्यानंतर अन्न विभागाने पोलिस बंदोबस्कातात रवाईची तीव्र केली आहे.

शहर दंडाधिकारी सुधीर कुमार सोनी यांनी अन्न विभागाच्या पथकासह मंगनपूर गावावर छापा टाकला. गावात मोठ्या प्रमाणावर पांढरे रसगुल्ले तयार केले जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. हे पथक गावप्रमुखाच्या घरी पोचले, तेव्हा त्यांना तिथे रसगुल्ले तयार होत असल्याचे आढळून आले.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात तयार रसगुल्ले आणि त्यांच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. तपासात असे उघड झाले, की हा व्यवसाय सरपंचाचा मुलगा, शेन आलम चालवत होता. कारखान्याकडे परवाना नव्हता. या छाप्यात अंदाजे ४,५०० किलोग्रॅम पांढरे रसगुल्ले जप्त करण्यात आले.

अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने तयार केलेल्या रसगुल्ल्यांचे, तसेच त्यांच्या उत्पादनात वापरलेल्या घटकांचे नमुने गोळा केले. सर्व नमुने तपासणीसाठी मेरठ येथील अन्न विभागाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तपासणी अहवालात रसगुल्ले निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळले.

दरम्यान, रसगुल्ले बनवण्यासाठी वापरण्यात येणारा पनीर आणि मक्याचा स्टार्चदेखील गुणवत्ता मानकांवर उतरला नाही. त्याच गावचा रहिवासी असलेल्या मुबारिककडून जप्त केलेला छेनाचा नमुनाही निकृष्ट दर्जाचा आढळला. अन्न विभाग आता प्रयोगशाळेच्या अहवालाच्या आधारे संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत आहे.

हजरतनगर गढी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंगनपूर गावात रसगुल्ला बनवण्याचा व्यवसाय अनेक वर्षांपासून चालू आहे. शहर दंडाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, छाप्यादरम्यान जप्त केलेले रसगुल्ले केवळ चार दिवसांत तयार करण्यात आले होते. घटनास्थळावरून रसगुल्ला बनवण्याचे यंत्र आणि इतर उपकरणेही जप्त करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!