पुणे शहरात गुन्हे शाखे अंर्तगत मोठी कारवाई; सात पिस्तुल अन् ९ आरोपींना अटक…

पुणे (संदिप कद्रे): गुन्हे शाखा युनिट ३, पुणे शहर कडून ०३ बेकायदेशीर गावठी पिस्तुले व ०६ जिवंत काडतुसे, युनिट २ कडून ०२ पिस्तुले व ०३ जिवंत काडतुसे, सिंहगड रोड पोलिस ठाण्याकडून ०२ पिस्तुले व ०२ जिवंत काडतुसे असे एकुण ०७ पिस्तुले व ११ जिवंत काडतुसे असा एकूण २,८६,२०० /- रूचा माल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुणे व सातारा येथील सराईत अभिलेखावरील एकुण ९ आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

गुन्हे शाखा युनिट ३ कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगराव पवार, सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलिस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलिस अंमलदार. शरद वाकसे, संजीव कळंबे, गणेश शिंदे, ज्ञानेश्वर चित्ते, सुजित पवार, महिला पोलिस अंमलदार सोनम नेवसे असे ११/०१/२०२५ रोजी अलंकार पोलिस ठाणे हददीत गस्त घालत होते. पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी आकाश बळीराम बिडकर (वय २४ वर्षे, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, नवश्या मारूती जवळ, दत्तवाडी, पुणे) हा गावठी पिस्तुल घेवून फिरत आहे. ही बातमी पोलिस उप-आयुक्त, गुन्हे निखील पिंगळे व सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे १ गणेश इंगळे यांना कळविली त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व बातमीप्रमाणे आकाश बिडकर यास डीपी रोडवरील बस स्टॉपसमोर, एरंडवणा, पुणे येथे पकडले. त्यावेळी त्याचेकडून ०१ बेकायदेशीर गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस जप्त केले आहे.

आकाश बिडकर याने पिस्टल बाळगलेबाबत तपास करता त्याचे सांगणे की, माझा चुलत मामा युवराज भालेराव (रा. पुणे) याचेबरोबर आमचे धाराशीव येथील जमिनीवरून वाद सुरू आहे. त्यामुळे मागच्या वर्षी आमच्यामध्ये दोन वेळा भांडणे झाली असून त्याबाबत पर्वती पोलिस ठाणेस एकमेकांविरूदध तक्रारी दाखल आहेत. माझा चुलत मामा व त्याचा मुलगा हा गुन्हेगारवृत्तीचा आहे. त्याने मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. म्हणून मी, माझे व घराच्यांच्या बचावासाठी माझा मित्र सुभाष बाळु मरगळे (वय २४ वर्षे रा. स.नं. ४६, मरगळे हाऊस, जाधव नगर, वडगाव बु. पुणे) याचेकडून ०१ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस डिसेंबर महिन्यामध्ये घेतले
होते असे सांगीतले.

आकाश बिडकर व इतर गोपनिय माहितीवरून सुभाष मरगळे याने आकाश बिडकर याला पिस्टल घेण्यास मदत केल्याबददल अटक केली आहे. सुभाष मरगळे याचेकडे पिस्टल कोठून आणले याबाबत तपास केला असता त्याचे सांगणे की, माझा मित्र सागर जानू ढेबे (वय २४ वर्षे, रा. हिल व्हयु सोसायटी, फ्लॅट नंबर २०२, वाडकर मळा, हडपसर, पुणे मुळ गाव मु. पो. मानगाव ता. वेल्हे, जि. पुणे) याचेकडून घेवून मी आकाश बिडकर याला विकले होते असे सांगीतले.

सुभाष मरगळे याचे माहितीवरून रेकॉर्डवरील आरोपी सागर ढेबे यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचेकडे ०१ गावठी पिस्टल व ०३ जिवंत काडतुसे मिळाली आहेत. सागर ढेबे यास अटक करून तपास केला. त्यावेळी सागर ढेबे याचे सांगणे की, दि. ३०/११/२०२४ रोजी मी व माझा मित्र ओंकार तानाजी लोकरे (रा. रायकर मळा, धायरी, पुणे) असे दोघे मोटर सायकलवरून जात असताना ओंकारचे जुन्या भांडणाच्या कारणावरून आमच्याजवळ राहणा-या अथर्व तरंगे व त्याच्या इतर अल्पवयीन मित्रांनी ओंकार यास पाठीमागून गोळी मारली होती व माझ्या पायावरसुध्दा एक गोळी मारली होती. त्यामध्ये ओंकार हा मयत झाला होता. त्यापासून अथर्व तरंगे व त्याचे मित्र मला जिवे मारणार आहेत असे समजल्याने मी मध्यप्रदेश येथील सुमनकौर मौलकसिंग कौर (रा. मु. शिगोर, पोस्ट बेहरामपुरा, खरगोन राज्य मध्यप्रदेश )यांचेकडून मला व माझ्या मित्रांना देण्यासाठी ०७ पिस्टल विकत आणली होती. त्यातील ०१ पिस्टल मी माझ्याकडे ठेवले. ०१ पिस्टल सुभाष मरगळे याला दिले. ०१ पिस्टल मी माझ्या तोंडओळखीचा आर्यन कडाळे (रा. सातारा याला दिले), ०२ पिस्टल मी माझा नातेवाईक बाळु धोंडीबा ढेबे यास दिले, ०२ पिस्टल मी तुषार माने याला दिले आहेत.” असे सांगीतले.

सागर ढेबे याचे माहितीवरून व गोपनिय बातमीदाराच्या मदतीने आर्यन विशाल कडाळे (वय १९ वर्षे, रा. २६६ बुधवार पेठ, सातारा) यास ताब्यात घेतले असता त्याने सदरचे पिस्टल शुभम दिनेश बागडे (वय २४ वर्षे, रा. साईकृपा बिल्डिंग, गुलमोहर सोसा. सातारा, मुळ रा. नवीन म्हाडा कॉलनी, सदर बाजार सातारा) याला विकल्याचे सांगीतले. शुभम बागडे यास ताब्यात घेतले असता त्याने ते पिस्टल गणेश ज्योतीराम निकम (वय २५ वर्षे रा. पिरवाडी, सातारा) याला विकल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे आर्यन, शुभम, गणेश यांना अटक करून गणेश निकम याचेकडून ०१ पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

सागर ढेबे याचे माहितीवरून रेकॉर्डवरील तडीपार आरोपी बाळू धोंडीबा ढेबे (वय २७ वर्षे, सध्या रा. कृष्णाई हॉटेल, फलटण, जि. सातारा मुळ रा. राममंदीराजवळ, जनता वसाहत, पुणे) याचा तपास केला असता त्यास सिंहगड रोड पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईगडे, पोलिस अंमलदार केकाण, ओलेकर यांचे बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीवरून न हे येथील व्हिजन शाळेजवळ पकडले. त्याचेकडून ०२ पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यानंतर सागर ढेबे याचे माहितीवरून रेकॉर्डवरील तडीपार आरोपी तुषार दिलीप माने (वय २० वर्षे रा. भेंडीचौक, हरणाई बिल्डींगच्या मागे, दुसरा मजला, आंबेगाव बुगा पुणे) यास ताब्यात घेतले.

तुषार याचेकडे पिस्टलबाबत तपास करता त्याने त्याचा रेकॉर्डवरील तडीपार मित्र तेजस मोहन खाटपे (रा. कात्रज, आंबेगाव, पुणे) यास दिले होते. त्यास गुन्हे शाखा युनिट २ कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सपोनि आशिष कवटेकर, पोलिस उप-निरीक्षक नितीन कांबळे, पोलिस अंमलदार. उज्ज्वल मोकाशी, शंकर कुंभार, शंकर नेवसे, निखील जाधव, संजय जाधव, ओंकार कुंभार, हनुमंत कांबळे, गणेश थोरात, साधना ताम्हाणे, अमोल सरडे, पुष्पेंद्र चव्हाण, विनोद चव्हाण, प्रमोद कोकणे, विजय पवार, राहुल शिंदे नागनाथ राख यांनी अटक करून त्याचेकडून ०२ पिस्टल व ०३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याबाबत अलंकार पोलिस ठाणे गुन्हा रजि. नंबर ०५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १११ (३), भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५, १४२ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा तपास ज्ञानेश्वर ढवळे, सहायक पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ३ हे करीत आहेत. याप्रकारे सागर ढेबे याने मध्यप्रदेश येथून आणलेली ०७ पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त करून भविष्यात एखादया व्यक्तिचा जाणारा जीव व होणारे गुन्हे यास प्रतिबंध केला आहे. तसेच गुन्हे
शाखा, युनिट ३ ने सन २०२४ मध्ये एकुण २७ पिस्टल व चालु वर्षात ०३ पिस्टल पकडले आहेत.

आरोपीं विरूध्द असणारे गुन्हे खालील प्रमाणे
याप्रकारे सागर ढेबे याने मध्यप्रदेश येथून आणलेलीं ०७ पिस्टल व जिवंत काडतुस जप्त करून भविष्यात एखादया व्यक्तिचा जाणारा जीव व होणारे गुन्हे यास प्रतिबंध केला आहे. तसेच गुन्हे शाखा युनिट ३ ने सन २०२४ मध्ये एकुण २७ पिस्टल व चालु वर्षात ०३ पिस्टल पकडले आहेत.

आरोपीं विरूध्द असणारे गुन्हे खालील प्रमाणे
अ.क्र आरोपीचे नाव दाखल असलेले गुन्हे
१ आकाश बळीराम बिडकर
१ ) पर्वती पोस्टे गुरनं ४२२ / २०१४ बीएनएस ११८(१) आर्म अॅक्ट ४, २५
२) पर्वती पोस्टे गुरनं २३२ / २०२४ बीएनएस ११८(१) वगैरे
(दुखापतीचे गुन्हे आहेत)

२ सागर जानू ढेबे
१) सिंहगड रोड पोस्टे गुरनं ५७१ / २०१९ भादंविक ३९५, आर्म अॅक्ट ४, २५ वगैरे
२) सिंहगड रोड पोस्टे गुरनं २६०० / २०२० भादंविक ३२६ वगैरे
३) सिंहगड रोड पोस्टे गुरनं २४३ / २०२१ भादंविक ३९२, आर्म अॅक्ट
४, २५ वगैरे(दरोडा, शस्त्र बाळगणे, जबरी चोरी, दुखापतीचे गुन्हे आहेत)

३ तुषार दिलीप माने (तडीपार )
१) भारती विदयापीठ पोस्टे गुरनं २३३ / २०२४ भादंविक ३०७, ३२४ आर्म अॅक्ट ३, २५ वगैरे
२) भारती विदयापीठ पोस्टे गुरनं ७२३ / २०२३ भादंविक ३९९, ४०२, आर्म अॅक्ट ३, २५ वगैरे ( दरोडयाची तयारी, शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे आहेत )

४ बाळू धोंडिबा ढेबे
१) सिंहगड रोड पोस्टे गुरनं ३५८ / २०२२ भादंविक ३०७ आर्म अॅक्ट ३, २५ वगैरे (शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे आहे . )

५ तेजस मोहन खाटपे (तडीपार)
१) भारती विदयापीठ पोस्टे गुरनं ७२८/२०२३ भादंविक ३०७ आर्म अॅक्ट ३, २५ वगैरे
२) भारती विदयापीठ पोस्टे गुरनं २३३ / २०२४ भादंविक ३०७, आर्म अॅक्ट ३, २५ वगैरे ( शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे आहेत)

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त, पुणे रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे पोलिस उप-आयुक्त, परि- ३, संभाजी कदम, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे १, श्री. गणेश इंगळे सहा.पोलिस आयुक्त, सिंहगड विभाग, अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट – २ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर व त्यांचेकडील पोलिस स्टाफ, सिंहगड रोड पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे व त्यांचेकडील स्टाफ, गुन्हे शाखा युनिट-३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. रंगराव पवार, सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलिस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलिस अंमलदार शरद वाकसे, संजिव कळंबे, सुजित पवार, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, सोनम नेवसे, चेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, महेंद्र तुपसौंदर, संजय आबनावे, लहू सुर्यवंशी, उदय राक्षे, विनायक येवले, विशाल इथापे, राहुल ढमढेरे यांनी केली आहे.

पुणे शहरात दारू पार्टीदरम्यान पिस्तुल हाताळताना चुकून सुटली गोळी अन्…

पुणे शहरातील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्टल जप्त…

स्वारगेट पोलिसांनी रेकार्ड वरील गुन्हेगारास पिस्टल मॅग्जीनसह केली अटक…

पुणे शहरात पिस्टल जवळ बाळगणाऱ्यास सहकारनगर पोलिसांनी घेतले ताब्यात…

Video: पुणे शहरात लाखो रुपयांचे अंमली पदार्थ व पिस्टल जप्त…

पुणे शहरात रेकार्डवरील सराईत गुन्हेगारास पिस्टल व काडतुसह युनिट २ कडून जेरंबद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!