नागपूर! चिमुकलीसोबत लैंगिक चाळे करणाऱ्याला बेदम चोप; ; उपचारादरम्यान मृत्यू…

नागपूर : नागपूरच्या पारडी पोलिस स्टेशनांतर्गत एका वस्तीत नऊ वर्षाच्या चिमुकलीसोबत लैंगिक चाळे करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याच्या संशयातून स्थानिक जमावाने आरोपीस बेदम मारहाण केली होती. सोमवारी घडलेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान, आरोपी नारायणदास वैष्णव याचा मंगळवारी (ता. ६) उपचारादम्यान मृत्यू झाला आहे.

आरोपी नारायणदास वैष्णव मुळचा छत्तीसगड राज्यातील भिलाई येथील रहिवासी असून सध्या पारडी भागात राहत होता. पिडीत चिमुकली घरा जवळील परिसरात खेळण्यासाठी गेली असता जवळच राहणाऱ्या नारायणदासने तिला जबरदस्तीने स्वतःच्या घरी नेले व तिच्यासोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांचा आरोपी नारायणदासने बालीकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय होता. तशा आशयाची तक्रार पारडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिस कारवाई सुरू असतानाच परिसरातील संतप्त जमावाने सोमवारी रात्री आरोपी नारायणदासला गल्लीत गाठले. जमावाने त्याला बेदम मारहाण सुरू केली. यात नारायणदास गंभीर जखमी झाला होता. मारहाणीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिसांनी जमावाच्या तावडीतून सोडवत नारायणदासला मेयो रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास नारायणदास याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या जमावातील संशयितांचा शोध सुरू केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्हा हादरला! नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेवर अतिप्रसंग…

संतापजनक! दारुच्या नशेत वृद्ध महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न अन् संपवलेही…

मुलींना नको तिथे हात लावायचा, आदिवासी आश्रम शाळेतील 21 विद्यार्थिनींचा विनयभंग…

भोंदूबाबाकडून लैंगिक शोषण! मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस…

डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या युवतीसोबत केलं नको ते कृत्य…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!