मुलुंड पूर्वेतील लेबर कॅम्पला भीषण आग; सिलिंडरचा स्फोट, ३२३ कामगाराची सुखरूप सुटका…
मुंबई: मुलुंड पूर्व येथे प्रकल्पग्रस्तांसाठी उभारण्यात येत असलेल्या इमारतींमध्ये काम करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या लेबर कॅम्पला गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीच्या घटनेत एलपीजी गॅस सिलिंडरचे सहा ते सात स्फोटाने मुलुंड हादरले. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कॅम्पमध्ये […]
अधिक वाचा...एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; पाहा नावे…
पुणे : पुण्यातील एस.एम जोशी पूलावर आंदोलन करणाऱ्या 15 जणांविरुद्ध अखेर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आंदोलन करण्यासाठी पोलिसांना पत्र दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, भेटीदरम्यान त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या होत्या, त्यामुळे आंदोलन स्थगिती केल्याचे पत्र त्यांनी पोलिस आयुक्तांना दिले होते. परंतु सकारात्मक वाटाघाटी करून आल्यानंतरही कोणतीही पूर्वकल्पना न देता […]
अधिक वाचा...मंत्रालयातील उच्च पदावरील महिला अधिकाऱ्याला लाखोंचा गंडा; मला तुझ्याशी लग्न करायचंय…
मुंबईः मंत्रालयात काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला मेट्रिमोनिअल साईटवरून जोडीदार शोधणं महागात पडले असून, तिची १८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेनं तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला या मंत्रालयातील एका विभागात अधिकारी म्हणून सेवेत आहेत. योग्य जोडीदाराच्या […]
अधिक वाचा...धक्कादायक! इंजिनिअर नवऱ्याने चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात घातला दगड…
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील हासेगाव परिसरात चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, चार वर्षांच्या चिमुकल्यासमोर त्याच्या आईची हत्या करण्यात आली. आरोपी गणेश टेकाळे फरार असून कळंब पोलिसांकडून शोध सुरू आहे. कोमल टेकाळे असे मृत महिलेचे नाव आहे. गणेश टेकाळे असे आरोपी पतीचे नाव असून तो इंजिनिअर आहे. सध्या त्याला […]
अधिक वाचा...चर्चांना उधाण! नाना पाटेकर यांच्या मृत्यू प्रकरणाचा गोवा पोलिस करणार तपास…
पणजी: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकाली निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, त्यांच्या मृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. कार्डिएक अरेस्टने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, गोवा पोलिसांनी या प्रकरणात अचानक एक मोठे पाऊल उचलल्याने त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत चर्चांना उधाण आले आहे. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या मृत्यूशी संबंधित कायदेशीर प्रक्रिया […]
अधिक वाचा...सोलापूर! रुग्णालयात उपचार घेत असलेल्या युवतीचा विनयभंग…
सोलापूर: सोलापूर शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका तरुणीचा तेथीलच एका कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह शहरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सोलापूर शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात पीडित युवती उपचारासाठी ॲडमिट होती. रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने तरुणीशी अश्लील चाळे करत […]
अधिक वाचा...हूती बंडखोरांचा सौदी अरेबियातील दोन विमानतळांवर हल्ला; तीन जण ठार, तर ३६ जखमी…
रियाधः सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने दिलेल्या निवेदनानुसार, सौदी अरेबियातील दोन विमानतळांवर हुतींनी केलेल्या हल्ल्यांमध्ये तीन नागरिक ठार आणि ३६ जण जखमी झाले आहेत. रियाधमधील आभा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले आहेत. आभा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हल्ल्यात मोरोक्को आणि अल्जेरिया येथील दोन महिलांचा मृत्यूमुखी पडल्या […]
अधिक वाचा...तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएने केली कॅडिला औषध कंपनीची तीन गोदामे सीलबंद, कारण…
मुंबई: समान ब्रँड नावे आणि पॅकेजिंग संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्र फूड अँड ड्रग प्रशासनाने, प्रसिद्ध औषध उत्पादक कंपनी कॅडिला फार्मास्युटिकल्सची ठाणे, पुणे आणि नागपूर येथील गोदामे सीलबंद केली आहेत. ही कंपनी ‘असिलॉक’ या ब्रँड नावाने वेगवेगळे सक्रिय घटक असलेली औषधे विकत होती. अधिकाऱ्यांच्या मते, ‘असिलॉक’ आणि ‘असिलॉक+’ या नावांमध्ये केवळ ‘+’ या चिन्हाच्या फरकामुळे […]
अधिक वाचा...दिल्लीच्या सीमापुरी भागात इमारत कोसळून चार जण मृत्यूमुखी, आठ जण जखमी…
नवी दिल्ली: ईशान्य दिल्लीतील सीमापुरी परिसरात बुधवारी (ता. ७) चार मजली इमारत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आणि तीन वर्षांच्या मुलासह किमान आठ जण जखमी झाले, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली. आज (गुरुवारी) सकाळी ढिगाऱ्याखालून आणखी एक मृतदेह बाहेर काढण्यात आल्याने मृतांचा आकडा चारवर पोहोचला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत […]
अधिक वाचा...पुणे! पोलिस अधिकाऱ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या…
पुणे (संदिप कद्रे): पोलिस उपनिरीक्षक (PSI) निलेश भाऊसाहेब पाटील यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) दुपारी तीनच्या सुमारास औंध परिसरात घडली आहे. या घटनेनंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. निलेश भाऊसाहेब पाटील (वय ५५) हे पुणे शहर पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक (PSI) म्हणून कार्यरत होते आणि सध्या त्यांची नेमणूक […]
अधिक वाचा...
