
सिया गोयल हिचं व्हॉट्सॲप चॅटमधून उघड झाली धक्कादायक माहिती…
पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतन याची होणारी भावी पत्नी आणि या प्रकरणातील आरोप सिया गोयल ही आधीच विवाहित असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे.
आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच घरच्यांपासून लपवून गुपचूप लग्न केले होते, असा खळबळजनक दावा पोलिसांनी केला आहे. दोघांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅटने या गुप्त विवाहाचं बिंग फोडलं असून, यामुळे या संपूर्ण हत्याकांडाला आता एक वेगळंच वळण मिळालं आहे. १८ जून रोजी लोहगडावरून ढकलून केतन अग्रवाल यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली आहे. सुरुवातीला हे प्रकरण त्रिकोणी प्रेमाचं वाटत होतं, मात्र पोलिसांच्या हाती लागलेल्या डिजिटल पुराव्यांनी पोलिसांनाही चक्रावून सोडले आहे.
View this post on Instagram
पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड, लोकेशन, चॅट आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीची सखोल पडताळणी केली. गेल्या ६ ते ७ महिन्यांतील डिजिटल डेटा तपासत असताना, सिया आणि चेतनने चार महिन्यांपूर्वीच विवाह केल्याचे निष्पन्न झाले. घरच्यांच्या भीतीने त्यांनी हे लग्न लपवून ठेवलं होतं आणि त्यानंतरच केतनला रस्त्यातून हटवण्यासाठी हा क्रूर कट रचण्यात आल्याचा संशय बळावला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवालचा खून करण्याचा पहिला प्रयत्न १४ जून रोजीच करण्यात आला होता. मात्र, त्या दिवशी प्रत्यक्ष कृती करताना सियाची हिंमत झाली नाही. ती कमालीची घाबरल्याने तो प्रयत्न फसला. यानंतर सियाने चेतनला चॅटवर म्हटलं, “माझं डेअरिंग होत नाहीये; तूही चल. आपण दोघे मिळून त्याला दरीत ढकलून देऊ.” अखेर १८ जून रोजी दोघांनी मिळून केतनचा काटा काढला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सियाच्या घरातून जुना मोबाईल पोलिसांना मिळाला; धक्कादायक माहिती समोर…
केतन अग्रवाल याच्या आजोबांनी आठवणीने व्याकूळ होत सोडला जीव…
पुणे! सियाची लाय डिटेक्टर टेस्ट नाकारली; जामिनाचा मार्ग मोकळा…
सीन रिक्रिएशन! लोहगडावर दाट धुकं अन् पाऊस, पोलिस भल्या पहाटे चेतनला घेऊन गेले…
सियाचा चक्रावून टाकणारा खुलासा! केतनसोबत महाबळेश्वरला रुममध्ये राहायचं नव्हतं…
सिया हिचा धक्कादायक खुलासा; केतनला दरीत ढकलल्यानंतर चेतन पळून गेला अन्…
केतनच्या वडिलांनी सियाबद्दल केला मोठा खुलासा; तिला अनेक वाईट व्यसनं…
केतनचे टक्कल अन् एक गोष्ट खटकायची, पोलिस तपासात सिया लागली घडाघडा बोलू…
खळबळजनक खुलासा! सिया बारावी नापास, दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड अन्…
पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल रात्रीच्या अंधारात पोहचले लोहगडावर अन्…
सियाची आई म्हणाली; केतनने मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं; दोघांनाही ढकलून द्या…
सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा; सगळं खोटं…
केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…
केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…
केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…
केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…
पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…
केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…
पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…
पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

