बार्शी-धाराशिव रस्त्यावर पुन्हा अपघात; युवकाचा जागीच मृत्यू…

बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): बार्शी-धाराशिव रस्त्यावरील तांदुळवाडीजवळ पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली असून, यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. सलग दोन दिवस होत असलेल्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

धाराशिव येथून स्कुटीवरून बार्शीच्या येणाऱ्या युवकांची ऊसाच्या ट्रॉलीला धडक बसून भीषण अपघात झाला. यावेळी झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार तर दुसरा युवक जखमी झाला आहे. शनिवारी (ता. २३) सकाळी 6 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

अमीर मुबारक सय्यद (वय 28, रा 422 गाडेगाव रोड, बार्शी) असे मृत युवकाचे नाव आहे. सोहेल खान हा जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पांगरी पोलिस पुढील तपास करत आहेत.

बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात; तिघा मित्रांचा जागीच मृत्यू…

अपघातानंतर धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा: गृहमंत्री

हृदयद्रावक! आईसमोरच लेकराचा जागीच अपघाती मृत्यू तर…

कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या दहा वासरांची अपघातामुळे सुटका…

नगर-कल्याण महामार्गावर अपघातात दहा ठार; संपूर्ण कुटुंबच संपलं…

ट्रक आणि कारचा भीषण अपघात 6 ठार; पाहा नावे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!