धक्कादायक! महाराष्ट्रात युवकाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण…

अहमदनगर: शेळी चोरी केल्याच्या संशयावरून युवकाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना हरेगाव (ता. श्रीरामपूर) घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हरेगाव येथील नाना गलांडे यांची काही दिवसापूर्वी शेळी आणी काही कबुतर चोरीला गेले होते. या चोरीच्या संशयावरून शुक्रवारी (ता. २५) सकाळी चार युवकांना त्यांच्या घरातून बाहेर फरफटत आणून त्यांचे कपडे काढून, त्यांना झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. युवकाची आई आपल्या मुलाला सोडवायली गेली, तेंव्हा तिलाही धक्काबुक्की करण्यात आली, असा आरोप जखमी युवकाच्या आईने केला आहे. तर, आम्ही दलित असल्याने मारहाण केल्याचा आरोप जखमी युवकाने केला आहे.

दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे दलित समाज आक्रमक झाला आहे. अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी दवाखान्यात जाऊन माहिती घेतली आहे. आरोपींना तत्काळ जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये मंदिरातील फोडल्या चार दानपेट्या…

अहमदनगर हादरले! नवरा-बायकोच्या भांडणानंतर बापाने फेकले चिमुकल्यांना विहीरीत…

नवऱ्याचे दुसरं लग्न सुरू असतानाच पत्नी मुलाला घेऊन पोहोचली लग्न मंडपात अन्…

धक्कादायक! जावयाने धोंडे जेवणानंतर पत्नी आणि सासूचा केला खून अन् पुढे…

पिता-पुत्राच्या संशयास्पद मृत्यूनंतर धक्कादायक माहिती आली पुढे…

आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला बापाने उचलले अन्…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!