नाशिक! निवृत्त RTO अधिकाऱ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या…

नाशिक : निवृत्त सहाय्यक मोटार परिवहन (RTO) अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सिटी सेंटर मॉल परिसरातील राहत्या घरात त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले. या घटनेमुळे नाशिक शहरातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

निवृत्त सहाय्यक परिवहन अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे हे नाशिकमधील सिटी सेंटर मॉल परिसरात वास्तव्यास होते. त्यांनी राहत्या घरातच स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं. गोळीबाराचा आवाज येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

हेमंत हेमाडे यांनी हा टोकाचा निर्णय नेमक्या कोणत्या कारणामुळे घेतला, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार, कौटुंबीक कारणातून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट किंवा इतर काही ऐवज मिळाला का? याची अधिकृत माहिती समोर आली नाही. सध्या पोलिस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत. एवढ्या मोठ्या पदावरील निवृत्त अधिकाऱ्याने अशाप्रकारे जीवन संपवल्याने विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची अचानक बदली; फटाके वाजवून सेलिब्रेशन अन् महिला कॉन्स्टेबलची दहशत…

पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..

पुणे! पोलिस अधिकाऱ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या…

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या…

पोलिस निरीक्षकाने आत्महत्या करणार असल्याचं पत्र लिहिलं पोलिस महासंचालकांना…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!