वणी उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अमरावती विभागातून प्रथम…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांचा कार्यक्रम सुधारणा विशेष मोहीमेंतर्गत राज्याच्या ३५८ तालुक्यातील १०,००० शासकीय कार्यालयांनी कौतुकास्पद कामगीरी केल्याचे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस विभागाचे कौतुक केले आहे. वणी (जिल्हा-यवतमाळ) येथील उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अमरावती विभागातून प्रथम आला आहे, हे विशेष.

या यशाचे श्रेय वणीचे उप विभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, पोलिस उप निरीक्षक अरुण नाकतोडे, पोलिस हवालदार प्रदीप ठाकरे, विजय वानखडे, SDPO कार्यालयातील पोलिस हवालदार इक्बाल शेख, महीला हवालदार उमा करलुके, वैशाली गाडेकर, अमोल नुनेरवार, अतुल पयधान व उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांना दिले आहे.

पोलिस विभागांच्या प्रत्येकी महसुली विभागातील उत्कृष्ट ३ तालुका कार्यालयाची निवड करतांना बेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोई सुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यावर सर्वच तालुका स्तरावरील अधिका-यांनी केलेल्या कामगीरी बद्दल मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.

वणी येथील उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात डायल ११२ ला उत्तम प्रतिसाद मिळाला असून वणी पोलिस स्टेशन ५१७, मारेगांव पोलिस स्टेशन १०९, शिरपूर पोलिस स्टेशन ७२, मुकूटबन पोलिस स्टेशन ८५ व पाटण पोलिस स्टेशन ५८ असे १०४१ नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. वणी उप विभागात ३६७ व्यक्तींची १ कोटी २९ लाख ७४ हजार ५६ रुपयाची मालमत्ता परत करण्यात आली आहे. तर २१२१ मालमत्ते पैकी १२१२ मालमत्ता न्यायालयाच्या आदेशानुसार विल्हेवाट लावण्यात आले आहे. आपले सरकार पोर्टल वर ३० एप्रिल २०२५ पुर्वीच्या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहे.

विशेष म्हणजे वणी उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या उप विभागात पोलिस अधिकारी व अंमलदार यांना शारिरीक दृष्ट्या फिट ठेवण्यासाठी तसेच व्यसनापासून दुर ठेवण्यासाठी व्हॉलीबॉल ग्राऊंड व सुसज्ज जिम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

राज्य पोलिस दलातील 22 पोलिस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…

फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

डिजिटल मीडियासाठी वाचनीय मजकूर आवश्यक : संतोष धायबर

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!