प्रियकराच्या सांगण्यावरून नर्सने केला नवऱ्याचा सलाईनमधून क्रुर मर्डर…

हैद्राबाद: प्रियकराच्या सांगण्यावरून नर्स म्हणून काम करणाऱ्या संध्याने आपल्याच नवऱ्याला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिल्या प्रयत्नात नवरा गेला नाही मग आरोपींनी दुसरा सर्वांना चक्रावणारा क्रुर मर्डर केल्याची माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे.

तेलंगणामध्ये एका नर्सचे गेल्या काही वर्षांपासून एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. तिने विवाहबाह्य संबंधातून प्रियकरासोबत मिळून नवऱ्याची हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने 30 जून रोजी पतीला छतावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न केला होता. पण या घटनेत तो वाचला. त्यानंतर त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना त्याच्या सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर इंजेक्ट टाकलं अन् नवऱ्याचा द एन्ड केला. पण पोलिसांच्या नजरेतून ही गोष्ट लपून राहिली नाही. मृत प्रशांत (वय ३५) हा आखाती देशातून परत भारतात आला होता. तिथं तो कामाच्या निमित्ताने गेला होता. आखाती देशातून परत आल्यानंतर त्याला संध्याच्या अनैतिक संबंधाबाबत कळले आणि त्यांच्यात भांडणे सुरू झाली. त्यावेळी संध्या आणि तिचा प्रियकर अनिल यांनी कट रचला. यामध्ये अनिलचा मित्र देखील सामील होता. योजनेनुसार साईने 29 जून रोजी प्रशांतला दारू पाजली आणि त्यानंतर त्याला एका इमारतीच्या गच्चीवर नेलं, जिथं संध्याच्या फोनवरील सूचनेनुसार त्याला खाली ढकलले. परंतु, त्याचा जीव गेला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

प्रशांतला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संध्या आणि साई यांनी त्याला घरी आणण्यापूर्वी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये फिरवले. प्रशांतला रुग्णालयातच संपवण्याचे त्यांनी ठरवले. प्रशांतला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना संध्याने कथितरित्या कॅन्युलाद्वारे टॉयलेट क्लिनर आणि भूल देणारे औषध सलाईनच्या माध्यमातून दिले आणि त्यातच प्रशांतचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांनी पत्नी संध्या आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. चौकशीत व्यंकट साईनेही पहिल्या खुनाच्या प्रयत्नात आपली भूमिका स्वीकारली आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी नंतर गुन्हा कबूल केला. तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, जिथं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सिया गोयल हिचं व्हॉट्सॲप चॅटमधून उघड झाली धक्कादायक माहिती…

नवविवाहित युवतीचा मृत्यूने उडाली खळबळ; मृत्यूच्या ३ तास ​​आधी…

पुणे! प्रेमविवाह केल्यानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध पत्नीला समजले अन्…

मुंबईत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी वहिणीचा लहान दिरावर दबाव…

सांगली! प्रेमविवाहानंतर रात्रीच्या सुमारास दुसऱ्या प्रियकराला घरी बोलवलं अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!