पुण्यातील महिला डॉक्टरला घातला गंडा; विश्वास नांगरे पाटलांचा पीए बोलतोय…

पुणे : IPS अधिकारी आणि नागपूर शहर पोलीस आयुक्त असलेले विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून पुण्यातील एका महिला डॉक्टरला 3 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 22 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला असून, याप्रकरणी पीडित महिला डॉक्टरने (वय ४३) पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेला हा गुन्हा पुढील तपासासाठी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात फिर्यादी महिला डॉक्टरच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने ‘मी सायबर सेल ऑफ इंडियामधून चौधरी बोलतोय आणि विश्वास नांगरे पाटील सरांचा असिस्टंट आहे’ असे सांगितले. त्यानंतर काही वेळातच दुसऱ्या एका क्रमांकावरून फोन आला आणि समोरील व्यक्तीने आपण मुंबई क्राईम ब्रँचचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

तुमचे आधार कार्ड एका संशयास्पद नंबरला लिंक असून तुम्ही अवैध जाहिरातबाजी आणि अश्लील मेसेज पाठवून पैसे कमवत आहात, तसेच तुमचे नाव मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या गुन्ह्यात आले आहे, अशी भीती चोरट्यांनी दाखवली. अटक टाळायची असेल तर सांगितलेल्या बँक खात्यात पैसे भरावे लागतील, असे धमकावल्याने घाबरलेल्या महिला डॉक्टरने चोरट्यांच्या खात्यावर 3 लाख रुपये पाठविले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही विश्वास नांगरे पाटील यांचा फोटो आणि आवाजाची नक्कल करत फसवणूकीचे प्रकार घडले आहेत.

IPS विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरून 78 लाख रुपयांना लुटलं…

Digital Arrest! IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; कोटींचा गंडा…

विश्वास नांगरे पाटील यांनी २६/११ च्या आठवणी केल्या जाग्या; मीच खातोय अधिक शिव्या…

पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी वादावर दिलं स्पष्टीकरण…

भाकरी पुन्हा करपली! विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने पोस्ट व्हायरल अन् मोठा खुलासा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!