
धक्कादायक! छोटा भाऊ, वहिनी अन् चिमुकल्याची सपासप वार करत केली हत्या….
सोनिपत (हरियाणा) : छोट्या भावाने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मोठ्या भावाने त्याच्यासह अन्य दोन जणांची धारदार शस्त्रानं हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
सोनिपतमधल्या राई तालुक्यातल्या बिंदरोली गावात ही घटना घडली आहे. मोठ्या भावाने धाकटा भाऊ, त्याची पत्नी आणि लहान पुतण्याची हत्या केली. घटनेनंतर आरोपी त्याच्या वडिलांना धमकी देऊन फरार झाला. वडिलांच्या तक्रारीवरून मुलाच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
बिंदरोली गावातल्या धर्मवीर यांनी कुंडली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यांना मनदीप आणि अमरदीप (वय 28) ही दोन मुले आणि तीन मुली आहेत. तिन्ही मुलींचा विवाह झाला आहे. धाकटा मुलगा अमरदीप सोनिपतमधल्या अतिरिक्त उपायुक्त कार्यालयात मानवी माहिती आणि संसाधन विभागाच्या कौटुंबिक ओळखपत्र शाखेत कार्यरत होता. अमरदीपचा तीन वर्षांपूर्वी भैंसवाल कलान गावातल्या मधूशी (वय 25) प्रेमविवाह झाला होता. या दाम्पत्याला तीन महिन्याचा शिवम नावाचा मुलगा होता. मनदीप अविवाहित आहे.
धर्मवीरने सांगितले, ‘अमरदीपने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने मनदीप नाराज होता. यावरून त्या दोघांमध्ये कायम वाद होत. बुधवारी रात्री अमरदीप त्याची पत्नी आणि मुलासह घराच्या अंगणात बाज टाकून झोपला होता. सकाळी उठल्यावर मी नातू शिवमला जवळ घेत खाऊ घातले आणि जनावरं चरायला निघून गेलो. काही वेळाने घरातून किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. मी घराच्या दिशेने पळत निघालो असता मनदीप दुचाकीवरून घरातून बाहेर पडताना दिसला. त्या वेळी त्याने मी अमरदीप, मधू आणि शिवमची हत्या केल्याचे सांगितले आणि धमकी दिली.’ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच डीसीपी गौरव राज पुरोहित, एससीपी मुकेश जाखड, स्टेशन प्रभारी देवेंद्र त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला आहे.
धक्कादायक Video: कोयत्याने सपासप वार अन् कारने चिरडलं…
हृदयद्रावक! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू…
गुजरातमध्ये गेम झोनमध्ये भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू…
प्रियकरासोबत बायको पळाली; दुसरी आणल्यावर पहिली आली माघारी अन्…
लग्न लावून देत नसल्याने दोन भावांनी बापाला कायमचं संपवलं…

