
सियाचा चक्रावून टाकणारा खुलासा! केतनसोबत महाबळेश्वरला रुममध्ये राहायचं नव्हतं…
पुणे: लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्याकांडातील मुख्य आरोपी सिया गोयल हिने प्रियकर चेतन चौधरी याच्या साथीने १८ जून रोजी केतनला कड्यावरून ढकलून दिले होते. पोलिस कोठडीत सुरू असलेल्या चौकशीत सियाने दिलेली कबुली ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत. सियाला केतनशी केवळ लग्नच टाळायचे नव्हते, तर त्याच्यासोबत एकाच रूममधील मुक्काम करणेही मान्य नव्हते. हा मुक्काम टाळण्यासाठी तिने थेट बालीचं प्री-वेडिंग फोटोशूट रद्द करण्यापासून ते थेट त्याचा काटा काढण्यापर्यंतची मजल मारल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे.
केतन आणि सिया यांच्या विवाहसोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली होती. लग्नाचे हॉल आणि इतर सर्व बुकिंग पूर्ण झाले होते. १९ जून रोजी सियाचा वाढदिवस होता. आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस संस्मरणीय ठरवण्यासाठी केतनने महाबळेश्वर येथील एका आलिशान हॉटेलमध्ये खास सेलिब्रेशन आणि मुक्कामाचे (नाईट स्टे) नियोजन केले होते. मात्र, या ट्रिपदरम्यान केतनसोबत एकाच रूममध्ये तिला राहायचे नव्हते. केतनसोबतचा हा मुक्काम कोणत्याही परिस्थितीत टाळायचा होता. म्हणून तिने वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवस आधी, म्हणजेच १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतनला संपवण्याचा कट रचला होता.
View this post on Instagram
केतनसोबत राहणे टाळण्याची सियाची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधी ६ जून रोजी हे जोडपे प्री-वेडिंग फोटोशूटसाठी ‘बाली’ (इंडोनेशिया) येथे जाणार होते. विमानाची तिकिटे आणि हॉटेल बुकिंग सर्व काही निश्चित झाले होते. मात्र, बाली दौऱ्यात केतनसोबत राहणे टाळण्यासाठी तिने केतनला सुगावा लागू न देता गुपचूप त्याच्या बॅगेतून त्याचा पासपोर्ट चोरला आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खालापूर फूड मॉलच्या स्वच्छतागृहात (टॉयलेट) फेकून दिला. पासपोर्ट अचानक गहाळ झाल्यामुळे केतनला बाली दौरा रद्द करावा लागला होता आणि सियाचा तो प्लॅन यशस्वी ठरला होता.
दरम्यान, बाली दौरा यशस्वीपणे रद्द केल्यानंतर सियाचा आत्मविश्वास कमालीचा वाढला होता. मात्र, त्यानंतर लगेचच समोर आलेल्या महाबळेश्वरच्या मुक्काम टाळण्यासाठी तिच्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नाही. अखेर, केतनसोबत एका खोलीत राहण्यापेक्षा तिने त्याला जगातूनच कायमचे हटवण्याचा सर्वात थरारक आणि भयानक मार्ग निवडला. लोणावळा ग्रामीण पोलिस या संपूर्ण धक्कादायक कबुलीनंतर न्यायालयासमोर पक्के पुरावे सादर करण्यासाठी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
सिया हिचा धक्कादायक खुलासा; केतनला दरीत ढकलल्यानंतर चेतन पळून गेला अन्…
केतनच्या वडिलांनी सियाबद्दल केला मोठा खुलासा; तिला अनेक वाईट व्यसनं…
केतनचे टक्कल अन् एक गोष्ट खटकायची, पोलिस तपासात सिया लागली घडाघडा बोलू…
खळबळजनक खुलासा! सिया बारावी नापास, दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड अन्…
पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल रात्रीच्या अंधारात पोहचले लोहगडावर अन्…
सियाची आई म्हणाली; केतनने मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं; दोघांनाही ढकलून द्या…
सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा; सगळं खोटं…
केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…
केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…
केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…
केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…
पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…
केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…
पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…
पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

