
दीर आणि वहिनीच्या हातात नको त्या कृत्यामुळे पडल्या बेड्या…
रांची (झारखंड): रांची पोलिसांनी दीर-वहिनीकडे ब्राउन शुगर आणि गांजा सापडल्यामुळे अटक केली आहे. शिवाय, पोलिसांना अनेक महत्त्वाचे पुरावे आणि अन्य अनेक आरोपींची माहिती मिळाली आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची टीम छापेमारी करत आहे.
रांची पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी कारवाई दरम्यान दीर आणि वहिनीला अटक केली आहे. पोलिसांना या छापेमारीमध्ये ब्राउन शुगर आणि गांजाही सापडला आहे. रांचीचे वरिष्ठ एसपी चंदनकुमार सिन्हा यांना अशी गुप्त खबर मिळाली होती, की ड्रग्ज पेडलर या परिसरातल्या तरुणांना ड्रग्ज वितरित करत आहेत. ही माहिती मिळताच रांची पोलिसांनी विशेष टीम तयार केली आणि कारवाई केली.
रांचीचे डीएसपी प्रकाश सोय यांनी सांगितले, ‘छापेमारीत ब्राउन शुगरच्या 19 पुड्या, तर सुमारे 20 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पवन कुमार आणि त्याची वहिनी कोमल देवी यांचा समावेश आहे. पोलिसांना चौकशीदरम्यान या प्रकरणाशी निगडित असलेल्या आणखी अनेकांची नावे पुढे आली आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल.’
वहिनी पहाटेच्या सुमारास भांडी घासत असताना दिर जवळ गेला अन्…
हृदयद्रावक! वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध; तीन चिमुकले अन् पोलिस…
वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा…
वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…
वहिनी घरात एकटीच असल्याचे पाहून दीर घुसला घरात अन्…

