
नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
नाशिक: नाशिकरोड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली असून, सामनगांव येथे वयस्कर महिलेच्या डोक्यात वार करून जबरी चोरी करणाऱ्या अटक आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून २८६ ग्रॅम सोने (२८.६ तोळे ) अंदाजे १६,५०,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सामनगांव (ता. जि. नाशिक) येथील महिला शकुंतला दादा जगताप (वय ७५) या ०१/०१/२०२४ रोजी दुपारी १५:४५ वाजेचे सुमारास सामनगाव येथे त्यांचे दुकानात असताना एका अनोळखीने पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवरून दुकानात येवून त्याच्याकडे असलेल्या लोखंडी रॉडने त्यांना गंभीर दुखापत करून त्यांचे अंगावरील सोन्याची पोत, व इतर दागिने असे एकुण ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेवून गेल्याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात गु.र.क्र ०३/२०२४ भा.दं. वि. कलम ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक गणेश शेळके हे करत होते.
यासोबतच गुन्हयाच्या समांतर तपासात गुन्हे शाखा, युनिट ०१ च्या पथकाने आरोपी पप्पु उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे (वय ३८, रा. कैलासजी सोसायटी, एफ-०१, रूम नं. ०५, जेलरोड नाशिक) यास ताब्यात घेवून नाशिकरोड पोलिस स्टेशन येथे हजर केले. अटक आरोपीने सुरूवातीस ०३ गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यात चोरीस गेलेला माल त्याचेकडे तपास करून हस्तगत करण्याबाबत वरीष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने वरीष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश शेळके यांनी आरोपी पप्पू उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे याचेकडे पोलिस कोठडी दरम्यान केलेल्या तपासात आरोपीने वृध्द महिलेस मारहाण करण्यासाठी वापरलेले हत्यार वाहनांचे नट बोल्ट खोलण्यासाठी वापरायचा पान्हा / रॉड, प्लेजर मोटारसायकल क्र. एमएच १५ डीडब्ल्यू २२५ आरोपीकडून गुन्हयात जप्त करण्यात आलेली आहे.
आरोपीस विश्वासात घेवून तांत्रिक विश्लेषण प्राप्त सीसीटीव्ही फुटेज, आरोपी सातत्याने बदलत असलेली ठिकाणे याबाबत सखोल आणि कौशल्यपुर्ण चौकशी करून केलेल्या तपासात आरोपीने एकुण ०७ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसेच आरोपीने खालील नमुद गुन्हयांतील चोरलेले सोन्याचे दागिने विक्री केलेले सोनार यांचा शोध घेवून त्यांचेकडे तपास करून त्यांचे ताब्यातून खालील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अ.क्र. पोलिस ठाणे गु.र.क्र. व कलम
जप्त मुद्देमाल / सोन्याचे दागिने / मुद्देमालाचे वजन
(ग्रॅममध्ये)
१ नाशिकरोड पोस्टे गुरनं ०३/२०२४
भादवि कलम ३९७, ५०६, ४११
सोन्याचे दागिने त्यात सोन्यांच्या मण्यांची पोत, सोन्याचे
डोरले असलेली छोटी पोत,सोन्याचे कर्णफुल व वेल
१७ ग्रॅम
ર नाशिकरोड पोस्टे गुरनं ३१ / २०२४
भादवि कलम ३८०, ४०६, ४११
सोन्याचे दागिने त्यात सोन्याचा हार, मंगळसुत्र, ०२
बांगडया, ०२ सोन्याच्या अंगठया व सोन्याचे गंठण
१४५ ग्रॅम
३ उपनगर पोरटे गुरनं २५५ / २०२३
भादवि कलम ३०२, २०१
सोन्याचे दागिने त्यात ४ सोन्याच्या बांगडया, सोन्याची
पॅन्डल असलेली काळया मन्याची पोत
५५ ग्रॅम
४ नाशिकरोड पोस्टे गुरनं २७२ / २०२३
भादवि कलम ४५४, ३८०
१५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड
५ नाशिकरोड पोस्टे गुरनं ४१८ / २०२३
भादवि कलम ३८०, ४५४
१९ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड
६ नाशिकरोड पोस्टे गुरनं ४८८ / २०२३
भादवि कलम ४५७, ३८०
१७.५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड
७ नाशिकरोड पोस्टे गुरनं ५०५ / २०२३
भादवि कलम ३८०, ४५४
१७.५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड
एकुण २८६ ग्रॅम वजनाचे सोन्यांचे दागिने व लगड ( अंदाजे १६,५०,०००/- रूपये)
वरील नमुद गुन्हयांत चोरीस गेलेले सोने खरेदी करणारे सोनार १) प्रशांत विष्णुपंत नागरे (वय ४३, व्य. सराफ दुकान, रा. गुरूकृपा हा. सो. सा. कॅनलरोड, जेलरोड, नाशिकरोड), २) हर्षल चंद्रकांत म्हसे (वय ४२ वर्षे व्य. सराफ दुकान रा. सिल्वर नेस्ट अपार्ट, विजय नगर, जयभवानी रोड, नाशिकरोड, नाशिक), ३) चेतन मधुकर चव्हाण (वय ३० वर्षे व्य. सराफ दुकान, रा. महात्मा फुले चौक, जव्हार, जिल्हा. पालघर) यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. गुन्हयात अटक आरोपीकडे तपास करून आरोपींविरोधात अधिकाधिक पुरावे प्राप्त करून गुन्हयाचा तपास करत आहोत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णीक, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ – २ मोनिका राऊत, सहा. पोलिस आयुक्त, नाशिकरोड विभाग डॉ. सचिन बारी यांचे मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलिस ठाणेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके, पवन चौधरी पोलिस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शेळके, पोहवा/१८०८ विजय टॅमगर, पोहवा / ८३० विष्णु गोसावी, पोना/ ५०५ बच्चे, पोशि /१९५० सागर आडणे, पोशि/२३८१ गोकुळ कासार, पोशि/२२६० रोहित शिंदे, पोशि/२०४ अरूण गाडेकर, पोशि/ २०७२ मनोहर कोळी, पोशि/५४ नाना पानसरे, पोशि/१५४२ यशराज पोतन, पोशि/२१७१ संतोष पिंगळ, पोशि/२५५० भाऊसाहेब नागरे चापोशि/५५४ रानडे, पोशि/ २२५५ कल्पेश जाधव यांनी केली आहे.
नाशिक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; डुप्लीकेट सोने विकणारी परप्रांतीय टोळी जेरबंद…
नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई; उच्च शिक्षित ताब्यात…
नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन…
नाशिक पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांची मोक्का अंर्तगत कारवाई; पाहा आरोपींची नावे…
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा ‘सुरक्षित नाशिक’ संकल्पनेवर भर…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

