
पुणे शहरात काम करत असलेल्या एअर हॉस्टेसची गोंदियाजवळ हत्या…
गोंदिया: पुणे येथील धानोरी परिसरातील एका खासगी विमान कंपनीत एअर हॉस्टेस असलेल्या आणि दिवाळीच्या सुट्टीत माहेरी आलेल्या एअर हॉस्टेसची धारदार चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. वर्षा पुरनलाल तुरकर (वय 35, रा. किन्ही-नवेगाव, ता. वारासिवनी, जि. बालाघाट, मध्य प्रदेश) असे मृत महिलेचे नाव आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून लुटमार केल्यानंतर तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती तिच्यासोबत असलेल्या नितेश अग्रवाल याने पोलिसांना दिली. या अधारे दवनीवाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
वैनगंगा नदीकाठावरील दवनीवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्या अर्जुनी-बोंडराणी येथील देवस्थान परिसरातील जंगलात ही घटना घडली आहे. वर्षा हिने 2019 मध्ये पुणे येथील एका युवकासोबत प्रेमविवाह केला होता. ती धानोरी (पुणे) येथे वास्तव्यास होती आणि एअर इंडिया कंपनीत लाईन ऑपरेटर म्हणून कार्यरत होती. पतीची इंदूर येथे बदली झाल्याने तो सध्या तेथे नोकरी करीत आहे. दिवाळीनिमित्त वर्षा आपल्या तीन वर्षीय मुलीसह माहेरी शेजारील मध्यप्रदेश राज्यातील किन्ही-नवेगाव येथे आली होती. 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास तिने मुलीला आई-वडिलांकडे ठेवले आणि नितेश नरेश अग्रवाल (वय 41, रा. मनोहर चौक, गोंदिया) याच्यासोबत कारने तिरोड्याकडे जाण्यासाठी निघाली होती.
View this post on Instagram
अर्जुनी-बोंडराणी येथील वैनगंगा नदी काठावरील श्रीराम मंदिर परिसरातील जंगलात त्यांनी कार उभी केली. सायंकाळी 5.30 ते रात्री 6 वाजताच्या सुमारास दोघे जंगलात बसून गप्पा मारत असताना तीन अज्ञात व्यक्ती तेथे येऊन तिघांनी चाकूचा धाक दाखवून लुटमार केली आणि वर्षाच्या पोटावर धारदार चाकूने वार करून घटनास्थळावरून पळ काढल्याचे नितेशने पोलिस व तिच्या नातेवाईकांना सांगितले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वर्षाचे नातेवाईक मध्य प्रदेशातील खैरलांजी येथून घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी अवस्थेतील वर्षाला त्यांनी खैरलांजी येथील रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच दवनीवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.
एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या…
सांगली! पुण्यातून दिवाळीनिमित्त गावी गेलेल्या विवाहित प्रेयसीची हत्या…
पोलिस ठाण्याबाहेर प्रेयसीचा गोंधळ अन् पोलिस उपनिरीक्षकाचा आढळला मृतदेह…
कुटुंबात लग्नाची लगबग अन् नगरसेविकेच्या मुलाने घेतला गळफास…
पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त अन्…

