हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मराठी, बंगाली अभिनेत्रींची सुटका…

मुंबईः मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरात सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या अवैध व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकत तीन अभिनेत्रींची सुटका केली. यापैकी एक अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका असल्याची माहिती समोर आली आहे, तर दुसऱ्या अभिनेत्रीने बंगाली इंडस्ट्रीमधील आहे. तिसऱ्या अभिनेत्रीनं बॉलिवूड चित्रपटांमध्ये कॅमिओ भूमिका साकारल्या आहेत. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

गिरगावातील एका हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान अभिनेत्रींची सुटका करण्यात आली. त्यांच्याकडून तसेच या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींकडून चौकशी सुरू असून या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक लॉजमध्ये पाठवला होता. देहव्यापार सुरू असल्याची खात्री होताच पथकाने तातडीने छापा टाकला. छाप्यामध्ये लॉजमधील विविध खोल्यांमध्ये सात महिलांना देहव्यापारासाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले. गिरगावमधील कारवाईनंतर मुंबई पोलिसांनी अशा प्रकारच्या हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटविरोधात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असून पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून या रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांचाही तपास केला जात असून संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापनाची भूमिकाही तपासली जात आहे.

उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांनी पकडले रंगेहात…

मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आरोपींच्या मोबाईलमध्ये 546 मुलींचे अश्लील फोटो अन् व्हिडिओ…

व्हॉट्सऍपच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा फर्दाफाश, तीन रशियन महिलांसह…

प्राध्यापकाच्या बंगल्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; परदेशी युवतीसह…

सना खान हत्या प्रकरणात धक्कादायक वळण; सेक्सटोर्शन रॅकेट अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!