पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, रेल्वे हायजॅक ; 6 जवान ठार, प्रवासी ओलीस…
लाहोर (पाकिस्तान): बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक केली असून 6 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आहे. रेल्वेमधील प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसला हायजॅक करण्यात आले आहे. बलूच आर्मीकडून 6 पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आले आहे. स्वंतत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी या परिसरात बलूच बिलरेशन आर्मी कार्यरत आहे. वेगळ्या बलुचिस्तानसाठी त्यांचा […]
अधिक वाचा...पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिस स्टेशन कडील रेकॉर्डवरील आरोपी हा अंमली पदार्थाची विक्री करताना मिळून आल्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मार्केटयार्ड पोलिस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार अतिक करीम बागवान (वय-२७ वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा- स.नं. ५७०, गल्ली नं. ०६, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड पुणे) याने आंबेडकरनगर परीसरात एम.डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी […]
अधिक वाचा...डॉक्टरचे महिलेशी अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल नंतर एकच खळबळ…
बुलढाणा: चिखली शहरातील एका प्रख्यात डॉक्टरचा महिलेशी अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एका नामांकित रुग्णालयाच्या डॉक्टरने आपल्याच केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असताना महिलेशी अश्लील चाळे करताना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसात कुठेही तक्रार दाखल झाली नसून, रुग्णालयात काम करणाऱ्या व व्हिडिओ व्हायरल झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरच्या रुग्णालयात जाऊन […]
अधिक वाचा...तुळजापूर अमली पदार्थ रॅकेट! महिलेकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड…
तुळजापूर: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी महिलेच्या खात्यात पोलिसांना मोठं घबाड सापडले आहे. पोलिसांनी आरोपी महिला संगीता गोळे हिचे बँक खातं गोठावले आहे. तसेच पोलिसांनी आरोपी महिलेकडून पाव किलो सोनंही जप्त केले आहे. महिलेच्या खात्यावर जे पाच कोटी रुपयांचे व्यवहार झाले, ते व्यवहार नेमके कुठून झाले, याचा स्त्रोत नक्की काय आहे? याचा तपास पोलीस करत […]
अधिक वाचा...खोक्या भाईने पैसे उधळल्यानंतर काय दिलं उत्तर पाहाच…
बीड: आपण एखाद्या लग्नात पैसे ओवाळून टाकतो, त्याला माज म्हणायचं का? मी पैसे उधळले म्हणजे काय केलं, तर माझ्या मित्राच्या लग्नात हजार रुपये सोडून दिले, त्याला कसला माज म्हणायचं?, असा प्रतिसवाल सतीश भोसले उर्फ खोक्या भाईने विचारला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असलेल्या सतीश भोसले याने एका व्यक्तीला रक्तबंबाळ होईपर्यंत बॅटने मारहाण केल्याचा […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी गौरव अहुजा याच्यासह मित्राचा उतरवला माज; लघवी केली तिथेच…
पुणे: पुणे शहरातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर येथे रस्त्यावर उभं राहून लघुशंका करणाऱ्या बड्या बापाचा मुलगा गौरव अहुजा याचा पुणे पोलिसांनी माज उतरवला आहे. गौरव अहुजा याने शास्त्रीनगर परिसरात सिग्नलवर आपली अलिशान बीएमडब्लू कार लावली आणि कार थांबवून तो रस्त्यातच लघुशंका करण्यासाठी उभा राहिला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने अहुजाचा हा कांड आपल्या फोनमध्ये कैद केला […]
अधिक वाचा...स्वारगेट बस स्टॅण्ड येथे लॅपटॉप चोरी करणारा स्वारगेट पोलिसांकडून जेरबंद…
पुणेः पुणे शहरातील स्वारगेट बस स्टॅन्ड येथे लॅपटॉप चोरी करणाऱ्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी लॅपटॉप जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. दिनांक 08/03/2025 रोजी सकाळी 05/30 वाजाताच्या सुमारास स्वारगेट बस स्टॅन्ड येथून दोन वेगवेगळया बसमधून अज्ञाताने दोन लॉपटॉप चोरी केल्याबाबत स्वारगेट पोलिस ठाणे येथे स्वारगेट पोलिस ठाणे गु. र. नं. 74/2025 […]
अधिक वाचा...पुणे! इंजिनिअर युवकाने अभिनेत्रीकडे पाहून केले हस्तमैथुन…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात बसमध्ये काही दिवसांपूर्वी एका प्रवासी युवतीवर अत्याचार केला होता. स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका इंजिनिअर युवकाने बसमधून प्रवास करणाऱ्या अभिनेत्रीकडे पाहून हस्तमैथुन केले आहे. पीडित अभिनेत्रीने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...पुणे! कोंढवा पोलिसांनी ४३,०४,०६० रूपये फिर्यादीस दिले परत मिळवून…
पुणे (संदिप कद्रे): शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाच्या नावाखाली वेगवेगळे टास्क देवून आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयामध्ये कोंढवा पोलिसांनी ४३,०४,०६० रूपये रक्कम फिर्यादीस परत मिळवून दिले आहेत. तक्रारदार यांनी गुन्हयाचे तपासाबाबत समाधान व्यक्त करून कोंढवा पोलिस स्टेशनचे आभार मानले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान व उपकरणे वापरुन गुन्हा करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सर्व वयोगटातील व्यक्ती सोशल […]
अधिक वाचा...बँकेवर दरोडा टाकणारे अवघ्या ४५ मिनिटांत जेरबंद…
बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या पथकाने सुर्डी येथील बँकेचे दरोडेखोर अवघ्या 45 मिनिटात जेरबंद केले आहेत. बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील डीसीसी बँकेवर दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. सदरील घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी तपासाची सूत्रे फिरवली आणि तालुका पोलिस […]
अधिक वाचा...
