पत्नीचे जीम ट्रेनरसोबत प्रेमसंबंध; पहाटे प्रियकराला घरी बोलवलं अन्..

लखनौ (उत्तर प्रदेश): अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी महिलेने जीम ट्रेनर असलेल्या प्रियकराच्या मदतीने पतीवर भल्या पहाटे चाकूने हल्ला केला. मात्र पतीने प्रसंगावधान दाखवत मदतीसाठी आरडाओरडा केला. यावेळी नागरिक धावत आल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील गाजियाबादच्या इंदिरापुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसुंधरा सेक्टर-१ मधील ‘जागृती आरडब्ल्यूए सोसायटी’त घडली. शशांक कंथरिया हे पत्नी प्रिया शर्मा हिच्यासोबत वास्तव्याला आहेत. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ५:१५ वाजेच्या सुमारास शशांकवर अचानक चाकूहल्ला करण्यात आला. शशांक यांची पत्नी प्रिया शर्मा ही सकाळी नेहमीप्रमाणे जिमसाठी घरातून बाहेर पडत होती, त्याचवेळी हा थरार घडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया जिमसाठी बाहेर पडत असतानाच तिचा जिम ट्रेनर प्रियकर प्रताप सिंह हा आधीच ठरलेल्या प्लॅननुसार घरात शिरला. त्याने घरात झोपेत असलेल्या शशांक यांच्यावर चाकूने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने गंभीर जखमी झालेल्या शशांक यांनी मदतीसाठी मोठ्याने आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारी जागे झाले. शेजारी बाहेर येत असल्याचे पाहून आरोपी प्रताप सिंह तेथून पसार झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शशांक यांना उपचारासाठी दाखल केले.

पोलीस चौकशीत या प्रकरणामागील धक्कादायक सत्य समोर आले आहे. आरोपी प्रताप सिंह हा ‘फिटनेस हेडक्वार्टर’ नावाच्या जिममध्ये ट्रेनर म्हणून कार्यरत आहे. आरोपी पत्नी प्रिया शर्मा ही गेल्या ७-८ महिन्यांपासून त्याच जिममध्ये व्यायामासाठी जात होती. याच दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढून त्यांच्यात अनैतिक प्रेमसंबंध निर्माण झाले. प्रताप याने चौकशी दरम्यान कबुली दिली की, त्या दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करायचं होते. मात्र, त्यांच्या या अनैतिक संबंधांची माहिती पती शशांक यांना मिळाली होती. त्यामुळे शशांक हे दिवाळीनंतर हा फ्लॅट सोडून दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी जाण्याच्या तयारीत होता. शशांकने हा फ्लॅट सोडला तर त्याच्यासोबत प्रियाही दूर जाईल आणि प्रेमात अडथळा निर्माण होईल, या भीतीने दोघांनी पतीला कायमचं संपवण्याचा कट रचला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.

इंजिनीअर युवतीने रात्रीच्या सुमारास प्रियकराला केला व्हिडिओ कॉल अन्…

प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्यानंतर संतापाचा कळस! भररस्त्यात नग्न धिंड अन्…

कोल्हापूर! लग्न ठरल्याने प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून; प्रियकराने सांगितले…

दोन मुलांच्या आईला नवऱ्याने भररस्त्यात प्रियकरासोबत पकडले; मिठी मारली अन्…

Video! पुणे शहरात MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या प्रियकरानं केले अपहरण अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!