पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, रेल्वे हायजॅक ; 6 जवान ठार, प्रवासी ओलीस…

लाहोर (पाकिस्तान): बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक केली असून 6 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आहे. रेल्वेमधील प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसला हायजॅक करण्यात आले आहे. बलूच आर्मीकडून 6 पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आले आहे. स्वंतत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी या परिसरात बलूच बिलरेशन आर्मी कार्यरत आहे. वेगळ्या बलुचिस्तानसाठी त्यांचा पाकिस्तानाविरुद्ध लढा आहे.

पाकिस्तानी प्रवाशांच्या रेल्वेचे अपहरण केल्यानंतर बीएलए आर्मीने गंभीर इशारा देखील दिला आहे. पाकिस्तानी सैन्याने कुठलंही पाऊल उचलल्यास किंवा कारवाई केल्यास रेल्वेमधील सर्वच प्रवाशांना ठार करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे बलूच आर्मीने अपहरण केलेल्या जाफर एक्सप्रेसमध्ये पाकिस्तानी सैन्य, पोलिस, आतंकवादी विरोधी दल, आयएसआयचे अधिकारी प्रवास करत होते. दरम्यान, या ऑपरेशनदरम्यान बीएलए आर्मीने रेल्वेमधील महिला, लहान मुले आणि बलूच प्रवाशांना सोडून दिले आहे. बीएलएचे फियादीन युनिट, मजिद ब्रिगेड या मिशनला लीड करत आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले की, रेल्वे पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलूचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तूनख्वाच्या पेशावरकडे जात असताना हल्ला करण्यात आला आहे.

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार…

पाकिस्तान हादरला! पोलिस अधिकाऱ्यासह ५२ ठार; शेकडो जखमी…

पाकिस्तानमध्ये मुख्याध्यापकाचा तब्बल 45 महिलांवर बलात्कार…

Video: पाकिस्तानमधील गरिबी; गाढवाला काय करावं लागतंय पाहा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!