तुळजापूर अमली पदार्थ रॅकेट! महिलेकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड…

तुळजापूर: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी महिलेच्या खात्यात पोलिसांना मोठं घबाड सापडले आहे. पोलिसांनी आरोपी महिला संगीता गोळे हिचे बँक खातं गोठावले आहे. तसेच पोलिसांनी आरोपी महिलेकडून पाव किलो सोनंही जप्त केले आहे.

महिलेच्या खात्यावर जे पाच कोटी रुपयांचे व्यवहार झाले, ते व्यवहार नेमके कुठून झाले, याचा स्त्रोत नक्की काय आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. शिवाय हा पैसा ड्रग्ज तस्करीतून मिळवला आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी तुळजापूरात काही दिवसांपूर्वा एका ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी ड्रग्ज तस्करी प्रकरणात तीन जणांना रंगेहाथ पकडले होते. तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे, युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड अशी या तीन आरोपींची नावं आहे. तिघांनाही तालमवाडी याठिकाणी अमली पदार्थांसह अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

खोक्या भाईने पैसे उधळल्यानंतर काय दिलं उत्तर पाहाच…

पुणे पोलिसांनी गौरव अहुजा याच्यासह मित्राचा उतरवला माज; लघवी केली तिथेच…

माजी मंत्र्याच्या पुतण्यावर गुन्हा दाखल; बलात्कार अन् गर्भपात…

संतोष देशमुख प्रकरण! मोकारपंती ग्रुपवर 4 व्हिडीओ कॉल; लई मारला आहे, आता…

Video: मस्साजोगची पुनरावृत्ती! युवकाचे अपहण करून भरदिवसा डोंगरात नेऊन जाळले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!