
पुणे पोलिसांनी गौरव अहुजा याच्यासह मित्राचा उतरवला माज; लघवी केली तिथेच…
पुणे: पुणे शहरातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर येथे रस्त्यावर उभं राहून लघुशंका करणाऱ्या बड्या बापाचा मुलगा गौरव अहुजा याचा पुणे पोलिसांनी माज उतरवला आहे. गौरव अहुजा याने शास्त्रीनगर परिसरात सिग्नलवर आपली अलिशान बीएमडब्लू कार लावली आणि कार थांबवून तो रस्त्यातच लघुशंका करण्यासाठी उभा राहिला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने अहुजाचा हा कांड आपल्या फोनमध्ये कैद केला होता.
गौरव अहुजा याने कॅमेऱ्याकडे पाहून अश्लील कृत्य केले होते. त्याने ऑन कॅमेरा आपले गुप्तांग दाखवत घटनास्थळावरून पळ काढला होता. या घटनंतर दुसऱ्या दिवशी गौरव अहुजा याने एक व्हिडीओ जारी करत पुणेकरांची माफी मागितली होती. शिवाय, एक संधी द्यावी अशी विनंती केली. यानंतर त्याने कराड पोलिसांकडे स्वत:ला सरेंडर केले होते. यानंतर कराड पोलिसांनी गौरव अहुजा याला पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पुणे पोलिसांनी गौरव अहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओस्वाल यांचा माज उतरवला आहे. सोमवारी पुणे पोलिसांनी दोघांनाही घटनास्थळी नेले. ज्या ठिकाणी गौरव अहुजा याने भररस्त्यात लघुशंका करत अश्लील कृत्य केले होते. त्याच ठिकाणी घेऊन जात पोलिसांनी दोघांची धिंड काढली. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील मुंढवा रोडवर असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये गौरव आहुजा होता, त्याच्यासोबत त्याचा मित्र भाग्येश ओसवाल देखील होता. गौरव हा त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याच्यासोबत त्या पबमध्ये गेले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर गौरव आहुजा याने पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन तिथे बसून तो दारू प्यायला होता, त्याचा देखील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हे हॉटेल मुंढवा परिसरातील आहे, पोलिसांनी त्याची बीएमडब्ल्यू कार ताब्यात घेतलेली आहे. ही कार त्याने कोल्हापूरमधील एका पेट्रोल पंपावरील पार्किंगमध्ये लावली होती. त्याची नंबर प्लेट लपवण्यात आली आहे. या प्रकरणासंबंधीचे जे पुरावे आहेतस त्यावरती त्याने छेडछाड केलेले आहे, असे पोलिसांनी काल कोर्टामध्ये सांगितले आहे. आज पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. आज त्याचे मेडिकल रिपोर्ट देखील येतील त्याने फक्त मद्य प्राशन केले होते की, आणखी काही ड्रग्ज वगैरे सेवन केले होते, ते देखील पोलिसांना तपासायचा आहे. गौरव अहुजा याने केलेल्या कृत्याविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
पुणे कार अपघातानंतर पब आणि बारवर पोलिसांच्या धाडी; युवक-युवतींची धांदल…
Video: पुणे पब ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे शहरातील एका प्रसिद्ध पबमध्ये जोरदार राडा; बनावट नोटांची उधळण…
पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्राच्या वाढल्या अडचणी…
पुणे पोर्श अपघात प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ए टू झेड…

