लोणीकंद पोलिसांनी महिलेच्या हत्येचा तपास केला उघड; धक्कादायक माहिती समोर…

पुणे (संदीप कद्रे) : नवऱ्याने आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार लोणीकंद पोलिस ठाण्यात नोंदवली होती. मात्र पोलिस तपासात नवऱ्यानेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

ललिता अमोलसिंग जाधव (वय 38 रा. फुलगाव ता. हवेली) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अमोलसिंग मुरली जाधव (वय 26) असे आरोपी नवऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबीक वादामुळे आरोपी अमोलसिंग मुरली जाधव याला आपल्या पत्नीपासून सोडचिठ्ठी हवी होती. मात्र, पत्नी सोडचिठ्ठी देत नसल्याने त्याने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह वाई घाटातील दरीत फेकून दिला होता. त्यानंतर तो पोलिस ठाण्यात पोहोचला, त्याने लोणीकंद पोलिस ठाण्यात आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. संबंधित घटना 28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी आठ ते दोन दरम्यान वाई तालुक्यातील मांढरदेवी ते वाई रोडवरील घाटात घडली होती.

पोलिसांनी पतीची तक्रार दाखल करून बेपत्ता पत्नीचा शोध सुरू केला. पती अमोलसिंग मुरली जाधव यानेच आपल्या पत्नीची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिस हवालदार प्रकाश नारायण आव्हाळे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोणीकंद पोलिसांनी समलैंगिक संबधातून खून करणाऱ्याला केली अटक…

लोणीकंद पोलिसांनी २७ लॅपटॉप केले जप्त; १८ गुन्हे उघड…

लोणीकंद पोलिसांची हातभट्टीवर कारवाई; पोलिसांचे आवाहन…

लोणीकंद पोलिसांनी वेशांतर करून पीएमपीएल बसमध्ये चोरी करणाऱ्यास पकडले…

वाघोलीमध्ये मुलीचा खून करणाऱ्या बापास युनिट ६ने तीन तासात केली अटक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!