
खोक्या भाईने पैसे उधळल्यानंतर काय दिलं उत्तर पाहाच…
बीड: आपण एखाद्या लग्नात पैसे ओवाळून टाकतो, त्याला माज म्हणायचं का? मी पैसे उधळले म्हणजे काय केलं, तर माझ्या मित्राच्या लग्नात हजार रुपये सोडून दिले, त्याला कसला माज म्हणायचं?, असा प्रतिसवाल सतीश भोसले उर्फ खोक्या भाईने विचारला आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असलेल्या सतीश भोसले याने एका व्यक्तीला रक्तबंबाळ होईपर्यंत बॅटने मारहाण केल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा सातबारा समोर आला होता. पोलिसांनी खोक्या भाईवर गुन्हा दाखल करुन त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र, पोलिसांच्या हाती न लागलेल्या खोक्या भाईने एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. सतीश भोसले उर्फ खोक्या याची चारचाकी गाडी बीड पोलिसांनी जप्त केली आहे. रात्री अकराच्या सुमारास बीड पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे.
मुलाखतीत सतीश भोसले उर्फ खोक्या भाई म्हणाला, ‘आपण एखाद्या लग्नात पैसे ओवाळून टाकतो, त्याला माज म्हणायचं का आपण? मित्राच्या कार्यक्रमात मी पैसे उधळले तो आनंदाचा क्षण होता. माझे पैसे मी उधळणारच ना. मी तो कष्टाने कमावलेला पैसा होता. मित्रासाठी हजार रुपये उधळणे चुकीचे असेल तर काढा इन्स्टाग्राम, त्यावर लोक तुम्हाला करोडो रुपये उधळताना दिसतील. कोणी बायांवर पैसे उधळतं, हे पाहा ना तुम्ही. मी मित्रासाठी उधळले तर काय झालं? मी छोट्या कुटुंबातील माणूस आहे. कारखान्याचे पैसे आले तर माझ्या मनात आलं की, आपलाही एक व्हिडीओ बनवून घ्यावा. माझ्याकडे तेव्हा पैसे आले होते, यामध्ये माज कसला आला? हातात पैसे आहेत तोपर्यंत एक व्हिडीओ बनवून घ्यावा, असे मला वाटले म्हणून मी तो व्हिडीओ तयार करुन घेतला.’
मी बॅटने मारल्याचे एक प्रकरण आहे, त्यामधील दिलीप ढाकणे हा माझा मित्राच्या पत्नीची छेड काढत होता. त्याच्याकडे मित्राच्या पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ होता. तो व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी तो देत होता. तू मी सांगितलेल्या गोष्टी केल्या नाहीत तर मी आंघोळ करतानाचा तुझा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी ढाकणे देत होता. मित्राने मला मदत मागितली. मी तिकडे गेलो तेव्हा माझं डोकं संतापलं आणि मी ढाक याणेला बॅटने मारले. मित्र हा जातीने वंजारी आहे, मी आदिवासी आहे. मग यामध्ये जातीय द्वेषाचा प्रकार कुठे येतो, असा सवाल सतीश भोसले याने व्यक्त केला आहे.
दरम्यान, खोक्याकडून पैशांचे बंडल फेकणे, हेलिकॉप्टरमधून उतरणं, हातात, गळ्यात सोन्याचे दागिने, गाड्यांमधून प्रवास असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर वन विभागाला घरामधून वाळलेले मांस, हत्यार, शिकारीचे जाळे आणि इतर साहित्य आढळले होते. तसेच दिलीप ढाकणे व महेश ढाकणे यांना कुऱ्हाड व सत्तूरने बेदम मारहाण केल्याचे वन विभागात 1, शिरूरमध्ये 2 असे एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. त्याचा पोलिस शोध घेत आहेत, मात्र त्याआधी सतीश भोसले उर्फ खोक्या याची गाडी बीड पोलिसांनी जप्त केली आहे.
बीडमध्ये अमानुष मारहाण! ‘खोक्या’ आला समोर अन् सांगितलं…
संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर बीडमध्ये कडकडीत बंदची हाक; पोलिसांचे जनतेला आवाहन…
वाल्मिक कराड याचा PSI सोबतचा फोन व्हायरल; मी बीड जिल्ह्याचा बाप…
बीड पोलिसांची आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई…
बीडमध्ये पोलिसांसाठी नवा आदेश, आडनाव घ्यायचं नाही; कारण…

