बारामतीमध्ये चोरी करण्यासाठी आरोपींनी चक्क ज्योतिषाकडून काढला होता मुहूर्त पण…
बारामती : बारामती पोलिसांनी चार महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावला आहे. आरोपींनी ही चोरी करण्यापूर्वी ज्योतिषाकडून मुहूर्त काढला होता, अशी माहिती तपासादरम्यान उघड झाली आहे.
बारामती तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील देवकातेनगर येथे महिलेचे यांचे हातपाय बांधून रात्रीच्या आठ वाजता दरोडेखोराने तब्बल 95 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम, वीस तोळे वजनाचे 11 लाख 59 हजार 300 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 35 हजार रुपयांचे तीन मोबाईल असा एकूण एक कोटी सात लाख 24 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती पोलिसांनी तपास सुरू केला होता. तब्बल चार महिन्यानंतर ही चोरी उघडकीस आली आहे.
आरोपींनी विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चोरीसाठी चक्क ज्योतिषाकडून मुहूर्त काढला होता, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हा दरोडा घालणारे गुन्हेगार हे एमआयडीसीतील मजूर कामगार आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सचिन अशोक जगधने, रायबा तानाजी चव्हाण, रवींद्र शिवाजी भोसले, दुर्योधन धनाजी जाधव आणि नितीन अर्जुन मोरे यांना अटक केली आहे.
दरम्यान, तृप्ती सागर गोफणे या त्यांच्या लहान मुलांसह घरात असताना चार अनोळखी चोरट्यांनी घराच्या कंपाऊंड भिंतीवरुन आत प्रवेश केला. तृप्ती गोफणे यांना मारहाण करुन त्यांचे हातपाय बांधून त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा घातला. त्यानंतर घरातील एक कोटी सात लाख 24 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. तृप्ती यांचे पती सागर गोफणे हे जमीन विक्रीचा व्यवसाय करत असून त्यांच्याकडे भरपूर पैसे असल्याची माहिती सचिन जगधने याला मिळाली होती. त्यानंतर गुन्ह्याचा कट रचना होता.
आरोपींनी कट करण्यापूर्वी रामचंद्र वामन चव्हाण हा फलटण तालुक्यातील आंदरुड येथील ज्योतिषी असून त्याच्याकडून गुन्हा करण्यासाठी मुहूर्त काढून त्याच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा केला, अशी माहिती पुढे आली आहे. संबंधित आरोपींकडून आतापर्यंत 76 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये 60 लाख 97 हजार रुपयांची रोकड, 15 लाख 35 हजार 410 रुपयांचे 26 तोळे सोने जप्त करण्यात आले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
लोणावळा येथे पर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारा ताब्यात…
दिल्ली ते नेपाळपर्यंत चोरी करून कमावली कोट्यावधी रुपयांची संपत्ती…
बकऱ्यांची चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद…
पुणे शहरातील ३५ गुन्हेगारांना केले हद्दपार…
चिखली पोलिसांनी मैत्रिणीस ताब्यात घेत गुजरातमध्ये जाऊन आरोपीस ठोकल्या बेड्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…