पोलिसांनीच केला धूम ठोकलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा सिनेस्टाईल पाठलाग…

धाराशिव : आनंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनीच पोलिसाचा सिनेस्टाईल पाठलाग करून एका गुन्ह्यात अटक केली. आरोपी पोलिस पळून जाताना आणि त्याला पकडतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लाच देणारा पोलिस, लाच घेणारा पोलिस, पकडणारा पोलिस, पळवून लावणारा पोलिस असा विचित्र प्रकार बघायला मिळाल्याने परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’

पोलिस निरीक्षक मारुती शेळके असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. बुधवारी त्याला एका महिला सहकाऱ्यासह लाचखोरी प्रकरणात एसीबीने रंगेहात पकडले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी शेळकेला एसीबी कार्यालयात आणले असता, त्याने कार्यालयातून धूम ठोकली. यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

धाराशीवमध्ये एक आत्महत्येचे प्रकरण उघडकीस आले होते. या आत्महत्येप्रकरणी एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाचं नाव समोर आले. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. या प्रकरणातून मुलाला वाचवण्यासाठी आरोपी पोलिस निरीक्षक मारुती शेळके याने आरोपी मुलाच्या आईकडे म्हणजेच महिला पोलिसाकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली. दोघांमध्ये वाटाघाटी घडून आरोपीच्या आईने एक लाख रुपये देण्याचे कबूल केले होते.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

लाच घेण्यासाठी आरोपी शेळके हा त्याची महिला सहकारी मुक्ता लोखंडे हिला घेऊन गेला होता. दोघांनी आरोपी मुलाच्या आईकडून ९५ हजार रुपये स्विकारले. यावेळी सापळा रचलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी पोलिस निरीक्षक मारुती शेळके आणि पोलिस अंमलदार मुक्ता लोखंडे यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यासाठी त्याना पोलिस ठाण्यात आणले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना आरोपी पोलिस निरीक्षक मारुती शेळके याने एसीबीच्या कार्यालयातून पळ काढला.

याबाबतची माहिती मिळताच एसीबीच्या पोलिसांनी त्याचा सिनेस्टाइल पाठलाग केला. धाराशिव शहरातील लेडीज क्लब समोरील रस्त्यावरून त्याची उचलबांगडी केली. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. शेळकेला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा एसीबीच्या कार्यालयात आणले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

महापालिका उपायुक्त लाखो रुपयांची लाच घेताना जाळ्यात…

क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना पकडले रंगेहात…

रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले अन् सापडले मोठे घबाड…

शिक्षणाच्या माहेरघरात लाच घेताना डीनला पकडले रंगेहात अन्…

लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!