
स्वारगेट बस स्टॅण्ड येथे लॅपटॉप चोरी करणारा स्वारगेट पोलिसांकडून जेरबंद…
पुणेः पुणे शहरातील स्वारगेट बस स्टॅन्ड येथे लॅपटॉप चोरी करणाऱ्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी लॅपटॉप जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत.
दिनांक 08/03/2025 रोजी सकाळी 05/30 वाजाताच्या सुमारास स्वारगेट बस स्टॅन्ड येथून दोन वेगवेगळया बसमधून अज्ञाताने दोन लॉपटॉप चोरी केल्याबाबत स्वारगेट पोलिस ठाणे येथे स्वारगेट पोलिस ठाणे गु. र. नं. 74/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2)अन्वये व स्वारगेट पोलिस ठाणे गु. र. नं. 75/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचां शोध घेत असताना दाखल गुन्हातील अज्ञात आरोपी हा गुन्हयातील चोरी केलेल्या लॉपटॉप सह सना पार्कीग लक्ष्मीनारायण चौक स्वारगेट येथून ट्रॅव्हलसने पर राज्यात जाणे करीता येणार असल्याच बातमी पोउनि बाळू सिरसट यांना त्यांच्या खास बातमीदारा मार्फत मिळाली होती.
सना पार्कीग व लक्ष्मीनारायण चौक येथे पोउनि बाळु सिरसट, पो. अं. नितीन क्षिरसागर, पो.अं. सुजय पवार हे सापळा रचून थांबलेले असताना सदर वर्णनाचा संशयीत इसम हातात दोन बॅग घेऊन सना पार्कीगच्या पाठीमागील बाजूस थांबलेला दिसला. त्यावेळी आमची बातमीप्रमाणे खात्री झाल्याने पोलिस स्टाफच्या मदतीने त्यांस पकडले. नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव 1) लियाकत गुडुसाब शेख (वय 56 वर्ष रा. एम एस मील मदीना कॉलनी गुलबर्गा) असे असल्याचे सांगितले. त्याच्याजवळ असेलेल्या बागमधील साहित्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचे साहित्य स्वारगेट एस. टी स्टॅन्ड येथे बसमधुन लॅपटॉप चोरले असल्याचे सांगितले. सदर साहित्य दाखल गुन्हातील चोरी गेलेली असल्याचे निष्पन्न झालेने 93,000/- एकुण रुपये किमतीचे एकुण दोन एच. पी. कंपणीचे दोन लॉपटॉप व 3,000/- रुपये रोख रक्कम पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करुन जागीच जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही अमितेश कुमार,पोलिस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलिस सह-आयुक्त पुणे शहर, प्रविणकुमार पाटील,अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, स्मार्तना पाटील, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ 02, पुणे शहर, राहुल आवारे, सहाय्यक पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युवराज नांद्रे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट पोलिस स्टेशन, पुणे शहर, रविद्र कस्पटे, पोलिस उप-निरीक्षक, बाळू सिरसट, पोलिस उप-निरीक्षक, पो. हवा. हर्षल शिंदे, पो. हवा. ठाकरे, पो. अं. नितीन क्षिरसागर, पो.अं. सुजय पवार पो. अं. संदिप घुले, पो. अं. दिपक खेदाड, पो. अं, नितीन दुधे, यांचे पथकाने केली आहे.
पुणे! इंजिनिअर युवकाने अभिनेत्रीकडे पाहून केले हस्तमैथुन…
पुणे! कोंढवा पोलिसांनी ४३,०४,०६० रूपये फिर्यादीस दिले परत मिळवून…
पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…
पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या मैत्रिणीला बोलावलं अन् माहिती आली समोर…
पुणे वाहतूक पोलिस ऍकेडमीत 65 पोलिस अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण…

