कर्जत हादरलं! पोलिसांनी तिहेरी हत्याकांडाचा केला उलगडा…

अहमदनगर: कर्जतमध्ये एकाच कुटुंबातील ३ जणांची हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये 9 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. या तिघांचे मृतदेह नाल्यात फेकले होते. अखेरीस पोलिसांनी तिहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे. घर नावावर केले नाही म्हणून सख्खा भावानेच भाऊ, वहिनी आणि पुतण्याचा खून केल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव येथील जैतू पाटील यांनी १५ वर्षांपूर्वी पोशिर येथे घर बांधले आणि ते कुटुंबासह तेथे राहात होते. जैतू पाटील यांना मदन आणि हनुमंत अशी दोन मुलं. दोन्ही मुलांची लग्न लावून दिल्यानंतर ते पत्नीसह बोरगाव या आपल्या मूळगावी रहायला गेले. दोन भाऊ मदन आणि हनुमंत हे त्यांच्या कुटुंबासह पोशिर येथे राहत होते. हनुमंत हा गवंडी काम करायचा तर मदन पाटील याची पत्नी अनिशा या आरोग्य विभागात आशा सेविका म्हणून काम करत होत्या. वडिलांनी बांधलेलं घर मदन याच्या नावावर होते आणि ही बाब हनुमंत याला खटकत होती. वडिलांनी बांधलेल्या घराचा अर्धा भाग आपल्या नावावर करून द्यावा यासाठी हनुमंतचा हट्ट होता. अनेकदा मदन सोबत वाद सुद्धा घालत होता.

दरम्यान, रविवारी (ता. ८) सकाळी १० वाजता नेरळ कळंब रस्त्यावरील एका नाल्यात मदन पाटील याचा दहा वर्षांचा मुलगा विवेक याचा मृतदेह आढळून आला. यानंतर स्थानिकांनी त्याच्या आई-वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, नाल्यात आई, अनिशा पाटील यांचा मृतदेह आढळून आले. समोरील दृश्य पाहून हादरलेल्या ग्रामस्थांनी पाटील बंधूंच्या घराकडे धाव घेतली. जेव्हा ग्रामस्थ मदन पाटील यांच्या घरी गेले तेव्हा तिथे मदन यांचाही मृतदेह आढळून आला. मदन पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी हनुमंत याला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच हनुमंत याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी हनुमंतला अटक केली आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासात धारदार शस्त्राने वार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नेरळ पोलिस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हृदयद्रावक! अहमदनगर जिल्ह्यातील नवदाम्पत्याने संपवलं आयुष्य…

अहमदनगर जिल्ह्यात निवृत्त पोलिसकाकाचा मृत्यू; महिला ताब्यात…

अहमदनगर जिल्ह्यात सिमरनने 8 महिन्यांत केली 9 लग्न; अखेर डाव फसला…

अहमदनगर हादरलं! प्रियकरासाठी आईनेच काढला पोटच्या दोन मुलांचा काटा…

अहमदनगर हादरलं! दारुड्याने संशयावरून पेटवले घर, तिघींचा होरपळून मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!