
पोलिस स्टेशनला निघालेल्या पोलिस अधिकाऱ्याचा गाडीतच मृत्यू…
मुंबई : पोलिस खात्यातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुंबईतील कुरार पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील कुमार गायकवाड असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. घरातून कामावर येताना गाडीमध्येच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील कुमार गायकवाड यांचे कर्तव्यावर येत असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नवी मुंबई उलवे येथील आपल्या राहत्या घरातून कर्तव्यावर निघाले असताना पोलिस ठाण्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिस दलात शोककळा पसरली असून, कामाच्या ताण आणि वरिष्ठांचा दबाव यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची चर्चा पोलिस दलात सुरू झाली आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला पोलिस दलात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी जाधव यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला होता.
View this post on Instagram
सात महिन्यापूर्वी दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांचे पोलिस निरीक्षक पदावरुन वरिष्ठ पोलिस निरीक्षक या पदावर पदोन्नतीने प्रमोशन झाले होते. सुशील कुमार गायकवाड हे पोलिस उपयुक्त गजानन राजमाने यांचा वाढदिवस साजरा करुन घरी नवी मुंबई उलवे येथे गेले होते. मात्र, मंगळवारी (ता. २७) सकाळी कर्तव्यावर येत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी आपल्यासोबत असणाऱ्या ड्रायव्हर आणि ऑपरेटरला याबाबत माहिती दिली. मला बरं वाटत नाही, थोडा गाडीतच आराम करतो मला उशी द्या असे म्हणत ते गाडीतच झोपी गेले. मात्र, कुरार पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर ड्रायव्हरने आवाज दिल्यानंतरही ते उठले नाहीत. त्यामुळे, ड्रायव्हरने हाताने हलवून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शरीर पूर्ण थंड पडले असल्याचे दिसले, सोबतच तोंडातून फेस देखील आला होता. त्यानंतर ड्रायव्हर आणि ऑपरेटर यांनी तात्काळ मालाड पठाणवाडी येथील डीएनए रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले
दरम्यान, कामाचा तणाव वाढल्यामुळे दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा मृत्यू झाल्याने पोलिस दलात शोककळा पसरली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी नाराजी देखील पसरली आहे.
पुणे! पोलिस अधिकारी गणेश तनपुरे यांचे हृदयविकाराने निधन; दोन दिवसांवर आली होती बदली…
नाशिक! नवरात्र बंदोबस्तावरील पोलिसांना कारने उडवले; पोलिस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू तर…
महिला पोलिस स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू; बहिणीचा गंभीर आरोप…
पुणे पोलिस दलातील हवालदाराचा बंदोबस्तादरम्यान हृदयविकाराने मृत्यू…
१४ वर्षांपूर्वी पोलिस गोळीबारात मुलगा मृत्यूमुखी पडलेल्या ठिकाणीच पित्याची आत्महत्या…

