माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे याला जामीन मंजूर; तब्बल साडे पाच वर्षांनंतर…
मुंबई : अल्टा माउंटरोड बॉम्बकांड आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे याला मोठा दिलास मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून त्याला जामीन मंजूर झाला आहे. तब्बल साडे पाच वर्षांनंतर तो तुरूंगाबाहेर येणार आहे. अल्टा माउंट रोडवर स्फोटके ठेवणे तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे याच्यावर गंभीर आरोप आहेत. मुंबई येथील मनसुख हिरेन हत्या […]
अधिक वाचा...तीन कोटींचे बेकायदा फटाके जेएनपीए बंदरावर जप्त; डीआरआय अधिकाऱ्यांकडून मुख्य संशयिताला अटक…
उरण: नवी मुंबईतील जेएनपीए बंदरावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई करत सुमारे तीन कोटी रुपये किमतीचे १० हजार किलोग्रॅम बेकायदेशीर फटाके जप्त केले. गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी संशयास्पद आयात केलेला कंटेनर रोखून त्याची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील मुख्य सिंडिकेट सदस्याला अटक करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान कंटेनरच्या सुरुवातीच्या तीन […]
अधिक वाचा...मोबाईल लिंकद्वारे वाहतूकदाराला गंडा; सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल…
पनवेल: कळंबोलीतील एका वाहतूक व्यावसायिकाला, गाडीवर वाहतूक चलन बजावल्याचा बनावट संदेश पाठवून त्यातील लिंकद्वारे मोबाईल हॅक करून त्याच्या बँक खात्यातून ५ लाख २० हजार रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे. तक्रारदार कासीम कारदअली शेख यांचा तळोजा एमआयडीसीत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय […]
अधिक वाचा...हवालदारावर हल्ला केल्याप्रकरणी ‘आप’चे सौरभ भारद्वाज, जरनैल सिंग यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल…
नवी दिल्ली: दिल्ली सरकारचे मंत्री परवेश वर्मा यांच्या कानशिलात मारल्याची घटना आता वाऱ्यासारखी पसरते आहे. एका पोलिस हवालदारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यात सौरभ भारद्वाज, जरनैल सिंग आणि ‘आप’च्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. साहिब सिंग यांच्या विरोधातही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी […]
अधिक वाचा...प्रियकर, मत्सर आणि खून; २०० वर्षांत पहिल्यांदाच अमेरिकेत महिलेला मृत्यूदंड…
टेनेसी: अमेरिकेतील टेनेसी राज्यात ३२ वर्षांपूर्वी एका भीषण गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या क्रिस्टा पाईक नावाच्या महिलेला ३० सप्टेंबर रोजी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. क्रिस्टा पाईक (वय ५०) हिला प्राणघातक इंजेक्शन देऊन मृत्युदंडाची शिक्षा दिली जाईल. गेल्या २०० वर्षांत टेनेसीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला कैद्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली जात आहे. यापूर्वी राज्यात १८१९ साली एका महिलेला […]
अधिक वाचा...पुणे पोलिस ॲक्शन मोडमध्ये, डीजे वाजवणाऱ्या मंडळांना धडाधड पाठवल्या नोटीसा…
पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिक्षेपकांच्या (साऊंड सिस्टीम) आवाजाची मर्यादा कायम राहावी यासाठी पुणे पोलिसांनी ‘चार बेस, चार टॉप’चा नियम लागू केला होता. मात्र, प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीत अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन करत आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी दोन दिवसांत १,२२४ गणेश मंडळांच्या आवाजाचे ‘रीडिंग’ घेतले असून, आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! माजी सरपंच महिलेसह दोघींचा मध्यरात्री झोपेतच चिरला गळा…
पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दोन महिलांची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या केली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे बारामती तालुका आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. माजी सरपंच इंदुबाई मारुती लडकत (वय ७५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ६५) या दोन्ही महिला रात्री […]
अधिक वाचा...केतन हत्या प्रकरण; ‘चेतनने माझ्यासमोर त्याला किल्ल्यावरून खाली ढकलले, मलाही धमकी दिली’, साक्षीदाराचा खुलासा…
पुणेः केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील पोलिसांच्या आरोपपत्रातून अनेक महत्त्वपूर्ण खुलासे झाले आहेत. १८ जून २०२६ रोजी लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवालच्या मृत्यूच्या प्रकरणातील एका प्रमुख साक्षीदाराच्या साक्षीतून घटनेचा संपूर्ण क्रम समोर आला आहे. साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार, त्याने खाकी रंगाची हुडी घातलेल्या एका तरुणाला केतनला मागून दरीत ढकलताना पाहिले. त्यानंतर केतनसोबत असलेल्या मुलीने त्याच्या गुडघ्याखाली जोरात लाथ […]
अधिक वाचा...एफबीआयच्या मोस्ट वाँटेड यादीत गोल्डी ब्रार; १० लाख डॉलर्सचे इनाम जाहीर…
वॉशिंग्टनः अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) सोमवारी गुंड गोल्डी ब्रारचा आपल्या १० मोस्ट वॉन्टेड फरारी गुन्हेगारांच्या यादीत समावेश केला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अमेरिकेच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ब्रारच्या अटकेसाठी उपयुक्त माहिती देणाऱ्यास १० लाख डॉलर्सपर्यंतचे इनाम जाहीर केले आहे. ब्रार सध्या अमेरिकेत असल्याचे मानले जाते. ब्रारचा शोध ‘ऑपरेशन […]
अधिक वाचा...मित्राच्या ‘शेवटच्या कॉल’मुळे आयआयटी विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा उलगडा होणार का?
मुंबई: आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आत्महत्या प्रकरणात डिजिटल पुरावे गोळा केल्यानंतर, गुन्हे शाखेने आता त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, वाकोडेने फोनवर एका मित्राला सांगितले होते की, त्याला थर्मोडायनामिक्स थिअरीच्या पेपरमध्ये कमी गुण मिळाले होते आणि तो अस्वस्थ होता. त्याने असेही सांगितले की, परीक्षेदरम्यान तो कॉपी करताना पकडला गेला होता. मुंबई गुन्हे […]
अधिक वाचा...
