नागपूरमध्ये भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना चिरडलं…

नागपूर : नागपूरमध्ये भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना चिरडले आहे. या घटनेत दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश आहे. ही घटना रविवारी (ता. १६) रात्री 12 वाजताच्या सुमारास वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कारचालकाला अटक केली आहे.

नागपूरमध्ये हिट अँड रन प्रकरणाचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी एक भरधाव कारने रस्त्याच्या कडेला असलेले अनेक वाहने उडवत ही कार थेट दुकानात शिरल्याची घटना घडली होती. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना एका भरधाव कारने चिरडल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या घटनेत दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

एका भरधाव इरटीका कार चालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना अक्षरक्ष: चिरडत नेले आहे. आरोपीने घटना स्थळावरून पळून जाण्याच्या नादात कारला मागेपुढे केल्याने अपघाताची तीव्रता अधिक वाढली असून यात 2 मजुरांचा मृत्यू झाला आहे. सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका बालकाचा समावेश आहे. जखमी सात मजुरांची प्रकुर्ती चिंताजनक असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान, अपघाताच्या या घटनेमुळे शहरात मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…

कोल्हापूरमध्ये कोयना एक्स्प्रेसखाली चिरडून दोन महिलांसह तिघींचा मृत्यू…

धक्कादायक Video: कोयत्याने सपासप वार अन् कारने चिरडलं…

अमरावतीमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्याला वाळूच्या ट्रकने चिरडलं…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!