
लग्नापूर्वी होणाऱ्या पत्नीला प्लॅटवर बोलावलं अन् लैंगिक शक्तीच्या गोळीनं गेला जीव…
गुरुग्राम (हरियाणा): लग्नापूर्वी होणाऱ्या पत्नीला प्लॅटवर बोलावलं पण लैंगिक शक्तीच्या गोळीमुळे युवकाचा (वय २९) जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना त्याच्या खोलीत काही औषधं आणि हेल्थ सप्लिमेंटचे रॅपर मिळाले आहेत. मृत युवक मूळचा नागपूरचा रहिवासी होता. तो नवी दिल्लीत कॉलिटी काऊन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यालयात काम करायचा. गुरुग्राममधील एका फ्लॅटमध्ये तो भाड्यानं वास्तव्यास होता.
पोलिसांनी रोहित याचे पार्थिव शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या ताब्यात दिले. रोहितच्या एका सहकाऱ्यानं याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर हा प्रकार गुरुवारी सकाळच्या सुमारास उघड झाला. रोहित आणि त्याचा सहकारी बहुतेकदा एकत्रच कार्यालयात जायचे. गुरुवारी सकाळच्या सुमारास रोहितच्या सहकाऱ्यानं त्याला अनेकदा फोन केले. पण रोहितने प्रतिसाद दिला नाही. सहकाऱ्यानं त्याच्या फ्लॅटचं दार अनेकदा ठोठावलं. पण रोहितनं दरवाजादेखील उघडला नाही. रोहितच्या सहकाऱ्यानं पोलिसांना हा प्रकार कळवला. काही वेळातच पोलीस तिथे दाखल झाले. त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना रोहित बिछान्यावर मृतावस्थेत सापडला. पोलिसांना त्याच्या खोलीत काही औषधं आणि हेल्प सप्लिमेंट्सचे रॅपर सापडले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, रोहित लाल याने त्याच्या होणार्या पत्नीला भेटायला बोलावले होते. दोघांचा साखरपुडा झालेला होता. युवती भेटायला येण्याआधीच रोहितचा मृत्यू झाला. लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे रोहितला हृदय विकाराचा झटका आला. रोहितचा व्हिसेरा आणि त्याच्या खोलीत सापडलेल्या गोळ्या तपासासाठी फॉरेन्सिकला पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. व्हिसेरा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण कळू शकेल, असे पोलीस म्हणाले. दरम्यान, रोहितचा विवाहापूर्वीच मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लॉजवर मैत्रिणीसोबत असताना शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने युवकाचा मृत्यू…
हनी ट्रॅप! श्रीमंतांना लक्ष्य करून लॉजवर बोलवायची अन् बाथरूममध्ये जाताच…
पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…
धक्कादायक! महिलेने लॉजमधील चुकीच्या रुमचा दरवाजा ठोठावला अन्…
दिवाळीच्या दिवशीच लॉजवर आढळला व्यापाऱ्याचा मृतदेह…

