राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ईडीचा दणका; कोट्यावधींची संपत्ती जप्त…

मुंबईः व्यावसायिक राज कुंद्रा यांची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नावावर असलेला फ्लॅट आणि बंगल्यावर जप्तीची कारवाई केली आहे. 2021 मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचे नाव समोर आले होते. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्रा याची काही महिन्यानंतर जामिनावर सुटका झाली आहे.

ईडीने आज (गुरुवार) व्यावसायिक राज कुंद्रा यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. राज कुंद्रा याची 97 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा म्हणजेच PMLA, 2002 अंतर्गत राज कुंद्रा विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नावावर असलेला जुहू येथील फ्लॅट, पुण्यातील बंगला आणि राज कुंद्रा याच्या नावाने असलेले काही इक्विटी शेअर्सही जप्त केले आहेत.

ईडीकडून राज कुंद्राविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी तपास सुरू आहे. एका क्रिप्टोकरन्सी प्रकरणात ईडीकडून राज कुंद्राची चौकशी सुरू आहे.

आम्ही वेगळे झालोय! अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र याचे ट्विट…

आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याचा फोन; म्हणाला…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!