
नामांकित कंपनीत नोकरी पाहिजे? अशी जाहिरात पाहिली असेल तर थांबा…
(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com)
पुणे : पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये मुलांची डायरेक्ट परमनंट भरती. पगार १६,५०० ते ६०,००० आणि भरपूर प्रलोभणे असणारी जाहिरात परराज्यात, परजिल्ह्यात केली जाते. बेरोजगार युवकांची मानसिक, शारिरीक आणि आर्थिक फसवणूक होत असल्याचा प्रकार सध्या पुणे जिल्ह्यातील Ranjangaon Midc मध्ये होत आहे.
परराज्यात, परजिल्ह्यात अथवा सोशल मीडियावरून नोकरीची जाहिरात व्हायरल केली जाते. अनेक बेरोजगार युवक नोकरीच्या आशेने संपर्क साधतात. स्थानिकांनी संपर्क केल्यानंतर समोरून उत्तर दिले जात नाही. मात्र, परराज्यातील अथवा परजिल्ह्यातील बेरोजगार युवकांना शोधून त्यांना बोलावले जाते. रांजणगाव एमआयडीसीमध्ये एकदा आले की सुरू होते ती गुलामगिरी. एखाद्या खोलीमध्ये गुलामासारखे डांबले जाते. नको ती कामे करून घेतली जातात. पोटभर जेवण मिळत नाही. पैसे मागितल्यानंतर मारहाण केली जाते. शिवाय, त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. अगोदरच बेरोजगार आणि त्यामध्ये दहशतीखाली जीवन जगावे लागते. अनेकजण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतात. पण, संधी मिळताच अनेकजण गुपचूप सुटका करून घेतात आणि पळ काढतात. जीवंत राहिलो हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे असल्यामुळे तक्रार न करता निघून जातात.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
परराज्यातून बेरोजगार युवक असल्यामुळे स्थानिक गोष्टींची माहिती नसते. शिवाय, गुंड ठेकेदारांची मोठी दहशत असल्यामुळे अनेकदा तक्रारी न करण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. ठेकेदारांच्या हेच पदरी पडत असल्यामुळे बेरोजगारीचा फायदा उचलत गलेलठ्ठ होत चालले आहेत. शिवाय, पुणे जिल्ह्यासह Ranjangaon Midcने नाव बदनाम करताना दिसत आहेत.
जाहिरातीमधील प्रलोभणे पाहा…
१) LG, Tata कंपनीमध्ये मुलांची डायरेक्ट परमनंट भरती
२) पगार : 16,500 ते ६०,००० हजार
३) कंपनी सुविधा : १) गरजू मुलांना प्राधान्य २) शिक्षण किंवा अनुभव अट नाही ३) संपर्क केल्यावर एक दिवसा जॉइनिंग ४) बाहेर गावातील मुलांसाठी जेवण, राहणे, बस फ्री
बाहेरगावातील मुलाांसाठी राहणे, जेवण व नाष्ट्याची सुविधा…
बस सुविधा, 8 तास काम, ओव्हर टाईम 160 ₹ तास, कामानुसार पगाराची वाढ, कामानुसार परमनंट होण्याची सांधी..!
दरम्यान, बेरोजगार युवकांसाठी खरंच एवढे कोणी करेल का? हे जाहिरात वाचल्यानंतर लक्षात येते. पण, गरजवंताला अक्कल नसते, त्या प्रमाणे त्याचा फायदा हे ठेकेदार गुंड उचलताना दिसत आहेत. Ranjangaon MIDC पोलिसांकडे यापूर्वी तक्रारी दाखल झाल्या असून, काही जणांना अटकही झाली आहे. पण, परराज्यातील बेरोजगार युवकांची फसवणूक करण्याचाच धंदा असल्यामुळे परत काही दिवसामध्ये जाहिराती व्हायरल करून लुबाडण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे बेरोजगार युवकांनो नोकरी देण्याची जाहिरात पाहून आपली फसवणूक टाळा. शिवाय, फसवणूक होत असेल तर रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करा, असे आवाहान पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.
तक्रारीसाठी संपर्क : policekaka100@gmail.com
(क्रमशः)
पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
28) पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
29) पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
30) पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
31) पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
32) सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
33) सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
34) वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
35) वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
36) वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
37) वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
38) वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
39) सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
40) सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
41) सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
42) सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!
43) पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!
44) पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
45) पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!
46) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!
47) श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!
48) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!
49) वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!
50) अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!
51) गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!
52) IPS सत्य साई कार्तिक! पोलिस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारा अधिकारी!

