हडपसर पोलिसांनी हस्तगत केले लाखो रुपयांचे मोबाईल…

पुणे (संदिप कद्रे): हडपसर पोलिस ठाणेकडील सायबर पथकाकडून गहाळ झालेले ७,५०, ५३७ रुपये किंमतीचे ३१ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. सदरचे हस्तगत करण्यात आलेले मोबाईल त्यांचे मूळ मालकांना परत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या दुरसंचार विभागाद्वारे हरवलेल्या / चोरीस गेलेल्या मोबाईलची माहीती मिळवणे संदर्भात ( Central Equipment Identiy Register CEIR) ही प्रणाली सुरू करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या CEIR प्रणालीचा वापर हडपसर पोलिस ठाणेकडील सायबर विभागाचे प्रमुख सुशिल डमरे (पोलिस उप निरीक्षक), महिला पोलिस अंमलदार गायत्री पवार, माधुरी डोके आणि सोनाली कुंभार यांचे टिमने केला. CEIR प्रणालीवर वेगवेगळया राज्यात तसेच महाराष्ट्रातील जिल्हयामध्ये हरवलेले मोबाईल चालु असल्याबाबत माहीती दिसत होती. सायबर टिमने हरवलेल्या मोबाईलची माहिती संकलीत करून त्यानंतर मोबाईल फोन वापरकरर्त्याशी संपर्क साधुन करून दिल्ली, कर्नाटक, बिहार या राज्यांमधून तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून एका महिन्यामध्ये नागरिकांचे किं. रू ७,५०,५३७/- चे ३१ मोबाईल हस्तगत केले आहेत. सदरचे हस्तगत करण्यात आलेले मोबाईल त्यांचे मूळ मालकांना परत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग व आर. राजा, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, रविंद्र शेळके साो, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर, विश्वास डगळे, पोनि. (गुन्हे) संदिप शिवले, पोनि. (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे सायबर पथकाचे पोलिस उप निरीक्षक, सुशिल डमरे, महिला पोलिस अंमलदार, गायत्री पवार माधुरी डोके आणि सोनाली कुंभार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

हडपसर पोलिसांनी रात्रीच्या वेळी लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना केली अटक…

पुणे न्यायालयातून पळालेल्या आरोपीस हडपसर पोलिसांनी केले जेरबंद…

एमपीडीए ७६! हडपसरमधील अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई…

Video: हडपसर पोलिसांनी गुन्हेगारांची काढली धिंड; पाहा नावे…

हडपसर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला जप्त…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!