पुणे शहरातील बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार पोलिस कर्मचारी अटकेत…

पुणे : पुणे शहरातील महिला पोलिसाने बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर फरार झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. याबाबातचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात ओळख वाढवून जेवणास घरी येऊन पोलिस शिपायाने कोल्ड्रींकमधून महिला पोलिस कर्मचाऱ्याला गुंगीकारक औषध दिले. महिला पोलिस कर्मचारी बेशुद्ध झाल्यावर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. शिवाय, त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार केले. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून पीडित महिलेच्या घरातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेल्या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

याप्रकरणी खडक पोलिसांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात नेमणूक असलेल्या पोलिस नाईक दीपक सिताराम मोघे या पोलिस कर्मचार्‍यावर आयपीसी 307, 376/2/एन, 377, 392, 506/2, 504, 323 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत गुन्हा दखल केला आहे. याबाबत एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २९४/२०२३) दिली आहे. हा प्रकार पोलिस वसाहत तसेच खडकवासला येथील लॉजवर २०२० ते १ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला आहे.

दरम्यान, आरोपी दीपक मोघे अटक टाळण्यासाठी फरार झाला होता. त्याच्यावर दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्याची दखल घऊन त्याला पोलिस दलातून निलंबित केले होते. आरोपीने सत्र न्यायालय, उच्च न्यायालय येथे वेळोवेळी जामीन मिळण्यासाठी अर्ज केले होते. मात्र, खडक पोलिसांनी आरोपीच्या विरोधातील पुरावे न्यायालयात सादर करुन त्याच्या जामिनाला विरोध केल्याने न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आरोपी सापडत नसल्याने न्यायालयाने आरोपीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. जामीनासाठी सर्व मार्ग बंद झाल्याने आरोपी दिपक मोघे हा 10 मे 2024 रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शिवाजीनगर पुणे एन.एच.बारी यांच्या कोर्टात हजर झाला. न्यायालयाच्या आदेशावरुन आरोपीला खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक करुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी.आर. डोनालपल्ले यांच्या कोर्टात हजर करुन पोलिस कोठडी घेतली.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल, सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार पुढील तपास करीत आहेत.

माजी आमदाराच्या मुलीवर बलात्कार, फोटोही काढले अन्…

पुणे शहरात कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या युवतीवर बलात्कार…

धक्कादायक! पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार…

धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील शाळेच्या बाथरूमध्ये मुलीवर बलात्कार…

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!