अहमदनगरच्या व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला; गावठी कट्टा सापडला…

अहमदनगर: अहमदनगर शहरातील बन्सी महाराज मिठाईवाले दुकानाचे मालक धीरज मदनलाल जोशी (वय 53) यांच्यावर गुलमोहर रोडवरील किर्लोस्कर कॉलनीत प्राणघातक हल्ला झाला असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. अज्ञात हल्लेखोरांनी तलवार यासारख्या हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला आहे. तसेच, घटनास्थळी एक गावठी कट्टा देखील मिळून आला आहे. व्यापाऱ्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करत असतांना झटापटीत पिस्तुल खाली पडली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

अहमदनगरमधील या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून, या प्रकरणी तोफखाना पोलिस घटनास्थळी दाखल करण्यात आला आहे. या प्राणघातक हल्ल्याने अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवर शनिवारी (ता. १०) रात्री साडेदहाच्या सुमारास धीरज जोशी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. जोशी हे शहरातील किर्लोस्कर वसाहतीत राहतात आणि त्यांचे शहरात रामचंद्र खुंट येथे मिठाईचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते रात्री दुकान बंद करून दुचाकीवरुन घरी निघाले होते. याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. त्यांच्यावर हातावर वार करण्यात आले. विशेष म्हणजे हल्लेखोरांकडे एक गावठी कट्टा देखील होता, मात्र झटापटीत तो खाली पडल्याने त्यांना गोळीबार करता आला नाही.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडलेल्या घटनास्थळी तलवारीसारखी एक वस्तू व पिस्तूल मिळून आली आहे. जोशी यांच्यावर हल्ला केल्यावर हल्लेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांचेसह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. हल्ल्याचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. सोबतच गुन्हे शाखेच्या पथकाकडून देखील या हल्लेखोरांचा शोध घेतला आहे. तसेच घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.

शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित आरोपी ससून रुग्णालयातून पळाला…

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; ॲाफिसमध्ये नेमकं काय काय घडलं?

गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…

महाराष्ट्र हादरला! पोलिस ठाण्यात शिंदे गटाच्या नगरसेवकावर भाजप आमदाराकडून गोळीबार…

माजी नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार…

पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!