पुणे शहरात लहानपणापासूनच्या भांडणातून गोळीबार; एकाचा मृत्यू…

पुणे: पुणे शहरातील धायरी येथे दोघा अल्पवयीन मुलांकडून युवकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ३०) सायंकाळी घडली. याप्रकरणी 16 आणि 17 वर्षाच्या दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. ओंकार तानाजी लोहकरे (वय 19, रा.रायकर मळा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही मुले एकाच परिसरात रहातात. त्यांची लहानपणापासून भांडणे आहेत. यामुळे पोलिसांनी त्यांना सुधारगृहात पाठवले होते. तेथेही त्यांची भांडणे होत होती. वर्षभरापूर्वी तिघेही रिमांड होममधून बाहेर आले होते. मात्र त्यांच्यात वैर कायम होते. दोघाही अल्पवयीन मुलांनी सोमवारी सायंकाळी ओंकारचा पाठलाग केला.

ओंकारला पहिली गोळी धायरी येथील सिल्हर बर्च हॉस्पिटलजवळ झाडली. मात्र, ती हुकल्याने ओंकारने पळ काढला. यानंतर दुसरी गोळी खडक चौकात मारली. त्यात जागीच मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पुणे शहरात महागड्या सायकली चोरणाऱ्या सुशिक्षीत बंटी-बबलीस अटक…

पुणे शहरात एका टाकीतून दुसऱ्या टाकीत गॅस भरताना स्फोट…

पुणे शहरात मध्यरात्री खुनाचा थरार, घरात घुसून झाडल्या गोळ्या अन्…

पुणे शहरात जवानाने घातला पोलिसाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक…

पुणे शहरातील आजोबा कॉल गर्लला भेटले अन् पुढे…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!