
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
पुणे: पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जात आहे. शिवाय, ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तकाचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते गणेशोत्सवादरम्यान प्रकाशन केले जाणार आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
पुणे शहरातील गणपती मंडळाचा उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गणपती मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळासाठी पुस्तकांची नोंदणी करावी, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या् वतीने करण्यात आले आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ ही दोन प्रकारे छापली जाणार आहे. एक म्हणजे संपूर्ण पुणे शहरातील गणपती मंडळाची माहिती असलेले (अंदाजे हजार पानांचे) आणि दुसरे म्हणजे मंडळाचे स्वतंत्र मुखपृष्ठ असलेले. (अंदाजे पाचशे पानांचे).
आपल्या मंडळासाठी गुगल फॉर्म भरून आजच नोंदणी करा…
दरम्यान, पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात विखुरलेले गणेशभक्त हे ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती अथवा दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जात आहे.
पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकेशन दिले जाणार आहे. गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, पुणे शहरातील गणपती मंडळांची हक्काची वेबसाईट असणार असून, फक्त गणपती उत्सव व मंडळाच्याच बातम्या, लेख, मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. शिवाय, गणपती मंडळांना परदेशातून वर्गणी मिळवून देण्यासाठी मंडळाचा बॅंकेचा क्यूआर कोड वेबसाईटवर दिला जाणार आहे.
मंडळांनी गुगल फॉर्म प्रमाणे आपल्या मंडळाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहचवावीत, म्हणजे पुस्तकामध्ये समाविष्ट करता येईल, असे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.
पुणे गणपती वेबसाईट आणि पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1) पुणे गणपती मंडळांची प्रथमच स्वतंत्र वेबसाईट
२) पुणे गणपती डायरी (पुस्तक), चार हजार मंडळांची एकत्रित माहिती.
३) प्रत्येक गणपती मंडळांचे वेबसाईटवर स्वतंत्र पान असणार
४) अध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांचे फोटो, माहिती, मुलाखती असणार
४) गणपती मंडळांच्या वर्षेभर बातम्या साईटवर असणार
५) प्रत्येक गणपती मंडळाचे असणार स्वतंत्र पुस्तक.
गणपती मंडळांनी काय माहिती पाठवायची?
१) गणपती मंडळाचा फोटो, मंडळाची स्थापना,
२) गणपती मंडळाचा पत्ता आणि संपर्क
३) अध्यक्ष यांचे छायाचित्र व नाव.
४) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, ग्रुप फोटो
५) मंडळाचे गुगल लोकेशन
६) गणपती मंडळाविषयी थोडक्यात माहिती व सामाजिक कार्यांची माहिती
७) माजी अध्यक्षांची नावे
८) मंडळाच्या बॅंकेच Qr कोड (परदेशातून वर्गणी मिळण्यासाठी)
९) सर्व एकत्रित माहिती पीडीएफ स्वरूपात WhatsApp अथवा इमेलवर पाठवावी.
पुणे गणपती डायरीसाठी गुगल फॉर्म
https://forms.gle/o78LiKGr83y2nQyRA
अधिक माहितीसाठी संपर्कः
WhatsApp: 93712 69949
puneganpatidairy@gmail.com
www.puneganpati.com

