Video: सीमा-सचिनच्या प्रेमकथेवर आधारित ‘कराची टू नोएडा’ पाहा टीझर…
नवी दिल्लीः पाकिस्तानची महिला सीमा हैदर आणि भारतीय नागरिक सचिन मीना या जोडप्याच्या प्रेमकथेवर आधारित असणाऱ्या ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अमित जानी यांनी ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन ‘कराची टू नोएडा’ असे शिर्षक दिले असून, बहुप्रतिक्षित अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपटाचा अधिकृत टीझर सादर करत आहोत. चित्रपट 2024 ला रिलीज होणार आहे, असे म्हटले आहे.
अमित जानी यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर शेअर करुन या चित्रपटाच्या स्टार कास्टची देखील माहिती दिली आहे. या चित्रपटात दीप राज राणा, एहसान खान, रोहित चौधरी, मनोज बक्षी, फरहीन फलक आणि आदित्य राघव या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. जयंत सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अमित जानी आणि भरत सिंह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमित जानी या चित्रपटाची कथा आणि संवाद लिहिले आहेत. अभिनेत्री फरहीन फलक ही ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटात सीमा हैदरची भूमिका साकारणार आहे.
दरम्यान, सीमा आणि सचिन यांची लव्ह स्टोरी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सीमा आणि सचिन यांची ओळख PUBG या गेमिंग अॅपच्या माध्यमातून झाली. सुरुवातीला त्यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सचिनच्या प्रेमासाठी सीमा पाकिस्तान सोडून भारतात आली आहे.
View this post on Instagram
सीमा-सचिनच्या लव्हस्टोरीवर येणार ‘कराची-टू-नोएडा’ चित्रपट…
Video: पाकिस्तानी सीमा हैदरला ‘बिग बॉस 17’ ची ऑफर
Video:सीमाने सचिनमध्ये असं काय पाहिलं?
Video: पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ समोर…
Video: सीमा हैदर हिने देवाला हात जोडून घातलं साकडं; म्हणाली…
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिने गरोदरपणाबाबत केला खुलासा…
सीमा हैदर करणार राजकारणात प्रवेश? RPI पक्षाकडून…
पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…
सीमा हैदर हिला सचिन आवडत नाही तर दुसरीकडे बीडी पिण्याचे व्यसन…
सीमा हैदर बाबत पाकिस्तानी बालमैत्रीणीचा गौप्यस्फोट…
सीमा हैदर प्रियकरासाठी भारतात दाखल अन् पाकमधील मंदिरांत सन्नाटा….