Video: पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ समोर…

लखनौ (उत्तर प्रदेश) : पाकिस्तानमधून भारतात दाखल झालेली माहिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सीमा हैदर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पोस्टाने राखी पाठविल्याचे व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

पाकिस्तानी सीमा हैदर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील दिग्गन नेत्यांना पोष्टाने राखी पाठवली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना तिने म्हटले आहे की, ‘पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यामुळे राखी पाठवून बहिणीच्या नात्याने आनंद व्यक्त केला आहे.’ शिवाय, सीमा हैदर हिने इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी उपवास आणि पूजा-अर्चा देखील केली होती.

दरम्यान, सीमा हैदरने अवैध पद्धतीने नेपाळमार्गे भारतात प्रवेश केला. मे महिन्यापासून ती नोएडामध्ये तिचा प्रेमी सचिनसोबत राहत आहे. दोघांनी हिंदू पद्धतीने लग्न केले आहे. त्यानंतर आता सीमा हैदर हिंदू धर्मीय महिलेप्रमाणे साडी, डोक्यावर पदर, कपाळावर कुंकू अशा वेशात दिसते. तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावाही केला आहे.

सीमा हैदर 30 वर्षांची आणि सचिन मीना 22 वर्षांचा आहे. या दोघांना ग्रेटर नोएडा पोलिसांनी 4 जुलै रोजी अटक केली होती. पण, न्यायालयाने 7 जुलै रोजी दोघांना जामीन मंजूर केला. पबजी गेम खेळताना सीमा आणि सचिन यांनी ओळख झाली. त्यानंतर सचिनच्या प्रेमासाठी सीमा हैदर बेकायदेशीरपणे भारतात आली. यामुळे भारताच्या सुरक्षेचा धोका असल्याचीही चिंता व्यक्त केली जात आहे.

Video: सीमा हैदर हिने देवाला हात जोडून घातलं साकडं; म्हणाली…

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिने गरोदरपणाबाबत केला खुलासा…

सीमा-सचिनच्या लव्हस्टोरीवर येणार ‘कराची-टू-नोएडा’ चित्रपट…

सीमा हैदर करणार राजकारणात प्रवेश? RPI पक्षाकडून…

पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…

सीमा हैदर हिला सचिन आवडत नाही तर दुसरीकडे बीडी पिण्याचे व्यसन…

सीमा हैदर बाबत पाकिस्तानी बालमैत्रीणीचा गौप्यस्फोट…

सीमा हैदर प्रियकरासाठी भारतात दाखल अन् पाकमधील मंदिरांत सन्नाटा….

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!