नवरदेवाने उपस्थितांना दाखवले नवरीचे नको ते फोटो अन् व्हिडिओ…

लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह समारंभादरम्यान विधी सुरू असताना नवरदेवाच्या मोबाईलवर फोटो आणि व्हिडिओ आल्याचे पाहून नवरदेवाला धक्का बसला. नवरदेवाने अचानक लग्नास नकार दिल्यामुळे एकच गोंधळ उडाला.

मोबाईल फोनवर मिळालेले फोटो आणि व्हिडिओमध्ये वधू दुसऱ्या मुलासह दिसत होती. व्हिडिओ तर न पाहण्यासारखाच होता. फोन करणाऱ्याने नवरदेवाला सांगितलं की, त्या मुलीशी लग्न करू नकोस, ती माझी आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे. यानंतर नवरदेवाने लग्नास नकार दिला. उपस्थितांनी त्याला कारण विचारले असता त्याने मोबाईलवरील फोटो आणि व्हिडिओ दाखवताच त्यांनाही धक्का बसला.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगाही गावातील होता. सर्वांनी त्याला ओळखलं. गावात गदारोळ झाला आणि मग ग्रामस्थांनी पंचायत बोलावली. पंचायत बसली आणि सर्वजण नवरदेवाला समजावू लागले. पण वराला ते मान्य नव्हते. पंचायतीतील लोकांनी समजूत काढल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी वधू-वरांना पोलिस ठाण्यात बोलावून सर्व प्रकार समजून घेतला.

गावात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, असे सांगत त्यांना स्वत: निर्णय घेण्यास सांगण्यात आले. यानंतर लग्नाची वरात वधूशिवाय परतली. पोलिस स्टेशन प्रभारी शोकेंद्र बालियान यांनी सांगितले की, वराला फोटो आणि व्हिडिओ पाठवणारा आरोपी वधूच्या गावातील रहिवासी आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या आधारे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. वधूच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल करून संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. पण, संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

अहमदनगर जिल्ह्यात सिमरनने 8 महिन्यांत केली 9 लग्न; अखेर डाव फसला…

धक्कादायक! लग्नानंतर दोन तासातच नवरदेवाने उचलले मोठे पाऊल…

धक्कादायक! लग्नासाठी तयार होत असलेल्या प्रेयसीचा पाठलाग केला अन्…

नवरदेवाची मैत्रीण ऐनवेळी घरी पोहचल्याचे नवरीला समजले अन्…

हनिमूनच्या रात्री नवरदेव लागला मोठ-मोठ्याने ओरडायला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!