पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिने गरोदरपणाबाबत केला खुलासा…

नवी दिल्ली : पाकिस्तान मधून 13 मे रोजी अवैधरित्या भारतात आलेली सीमा हैदर सध्या पती सचिन मीणा याच्यासोबत ग्रेटर नोएडा येतील घरात राहत आहे. सीमा हैदर हिची चौकशी पूर्ण झाली असून, तिला तिच्या चार मुलांसह पाकिस्तानात पाठवले जाईल अशी माहिती पुढे आली आहे. पण, तिच्या गरोदर पणावर जोरदार चर्चा आहेत, याबाबत तिने खुलासा केला आहे.

सीमा हैदर हिची प्रकृती बरी नसल्यामुळे सचिन तिला तपासण्यासाठी रुग्णालयात घेऊन जात होता. त्यामुळे सीमा हैदर पाच महिन्यांची गरोदर असल्याचे वृत्त प्रसारीत झाले होते. यावर सीमा हैदर हिनेच खुलासा केला आहे. ती म्हणाली, ‘हा व्यक्तिगत प्रश्न असून मीडियात याबाबत चर्चा करण्याची गरज नाही. जेव्हा काही असेल तेव्हा सर्वांना कळेलच.’

दरम्यान, सीमा हैदर गेल्या काही दिवसांपासून भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. सचिनशी नेपाळमध्ये लग्न केले असून धर्म परिवर्तन केल्याचे तिने सांगितले आहे. त्यामुळे भारतीय नागरिकत्व मिळावे अशी मागणी करत आहे. दया आणि सामाजिक आधारावर सीमाला भारतीय नागरिकत्व मिळू शकते. पण जन्माच्या आधारावर सचिन मीणा आणि सीमा हैदर यांच्या मुलाला नागरिकत्व मिळू शकत नाही.

2004 नंतर माता पिता पैकी एक भारतीय असेल आणि दुसरा अवैधरित्या घुसखोरी करून आला असेल तर त्यांच्या मुलाला नागरिकता मिळणार नाही. 2004 पूर्वी असे नव्हते. दुसरीकडे, सीमा हैदर आणि सचिन मीणा रविवारी घरावर तिरंगा फडकवताना दिसले. तिरंगा फडकवत सीमा हैदर हीने भारतात राहणार असल्याचे आपले म्हणणे स्पष्ट केले आहे.

सीमाचे वकील एपी सिंह याने सांगितले की, सीमाने कोणताही चित्रपट साईन केलेली नाही. भविष्यात अशी कोणतीच योजना नाही. चित्रपट निर्माता अमित जानी यांनी सीमा हैदर हीची भेट घेतली होती. पण, अमित जानी यांना आम्ही येथे पाठवले नव्हते. या चर्चेत अमित जानी यांनी फसवणूक करत व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओबाबत सीमाला काहीच माहित नाही. ती पाकिस्तानातून येथे चित्रपटात काम करण्यासाठी आली नाही. सीमा सचिनसोबत खूश आहे.’

सीमा-सचिनच्या लव्हस्टोरीवर येणार ‘कराची-टू-नोएडा’ चित्रपट…

सीमा हैदर करणार राजकारणात प्रवेश? RPI पक्षाकडून…

पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…

सीमा हैदर हिला सचिन आवडत नाही तर दुसरीकडे बीडी पिण्याचे व्यसन…

सीमा हैदर आणि सचिन मीनाला ATSने चौकशीसाठी घेतले ताब्यात…

सीमा हैदर बाबत पाकिस्तानी बालमैत्रीणीचा गौप्यस्फोट…

सीमा हैदर प्रियकरासाठी भारतात दाखल अन् पाकमधील मंदिरांत सन्नाटा….

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!