सीमा-सचिनच्या लव्हस्टोरीवर येणार ‘कराची-टू-नोएडा’ चित्रपट…

नवी दिल्लीः पाकिस्तानी महिला सीमा हैदर तिचा प्रियकर सचिन मीना याला भेटण्यासाठी थेट भारतात पोहोचली. दोघांची प्रेमकहाणी गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. दोघांच्या प्रेम कहाणीवर एक चित्रपट बनवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्य नावाची नोंदणीही करण्यात आली आहे.

दिग्दर्शक अमित जानी सीमा हैदर आणि सचिन यांच्यावर चित्रपट बनवणार आहे. दिग्दर्शक अमित जानी यांनी आधीही सीमाला एका चित्रपटाची ऑफर दिली होती. त्यांनी सीमा हैदरला ‘अ टेलर मर्डर स्टोरी’ (A Tailor Murder Story) या चित्रपटाची ऑफर दिली आहे. या चित्रपटात सीमा रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे.

दरम्यान, पाकिस्तानातून पळून भारतात प्रियकर सचिन मीनाला भेटण्यासाठी भारतात अवैधरित्या पोहोचलेल्या सीमा हैदरच्या पासपोर्टची पडताळणी अद्याप झालेली नाही. तिची कागदपत्रेही पाकिस्तानातून परत आलेली नाहीत. अवैधरित्या भारतात पोहोचल्यामुळे सीमा हैदर प्रकरणात दहशतवादी अँगलचा तपास सुरु आहे. असे असूनही सीमा हैदर आणि सचिन प्रसिद्धीझोतात आहेत. सीमा हैदर आणि सचिन यांच्यावरील चित्रपटाचे नाव ‘कराची ते नोएडा’ असे ठेवण्यात आले आहे.

अमित जानी यांनी ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटासाठी नाव नोंदणी केली आहे. ‘ए टेलर मर्डर स्टोरी’ चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी सीमा आणि अंजू यांच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवण्याचं काम सुरू केले आहे. सीमा हैदरवर लवकरच ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचे थीम साँगही लाँच होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी सीमाचा काही संबंध असल्याचा संशय आल्यास सीमाला तुरुंगात जावं लागू शकते. सीमा हैदरसोबतच तिला मदत करणाऱ्या आणि तिला आश्रय देणाऱ्या सचिन मीनावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. सीमाचा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा संशय आहे. मात्र, ती पाकिस्तानी दहशतवादी संघटना आयएसआयची गुप्तहेर असल्याचे तपासात अद्याप समोर आलेले नाही. यासंदर्भात उत्तर प्रदेश एटीएसकडून तपास सुरु आहे.

सीमा हैदर करणार राजकारणात प्रवेश? RPI पक्षाकडून…

पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…

सीमा हैदर हिला सचिन आवडत नाही तर दुसरीकडे बीडी पिण्याचे व्यसन…

परदेशी प्रेम! बांग्लादेशी ‘जूली’ ‘सीमा’ ओलांडून भारतात आली अन् पुढे…

सीमा हैदर बाबत पाकिस्तानी बालमैत्रीणीचा गौप्यस्फोट…

सीमा हैदर प्रियकरासाठी भारतात दाखल अन् पाकमधील मंदिरांत सन्नाटा….

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!