येरवडा तपास पथकाने सराईत आरोपींना केले जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील येरवडा पोलिस स्टेशन हद्दीत जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला येरवडा तपास पथकाकडून जेरबंद करण्यात आले आहे. येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास पोलिस करत आहेत.

२२/०८/२०२३ रोजी रामवाडी पुणे येथे १४/१५ वाचे सुमारास फिर्यादी हे दुचाकी वरुन जात असताना रोडला बाजूला थांबले असताना पाठीमागून आलेल्या दुचाकी वरील व्यक्तींनी फिर्यादी यांच्या पॅन्टचे खिशातील २५,००० रुपये जबरदस्तीने काढून घेतले म्हणून येरवडा पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अंमलदार प्रशांत कांबळे व सुशांत भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा महंमदवाडी वानवडी भागात येणार आहे. सदरची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक येरवडा पोलिस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे व श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोलिस अंमलदार सागर जगदाळे, अमजद शेख, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, अनिल शिंदे यांनी तेथे जावून संशयीतांना पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले.

१. अस्लम उर्फ बिल्ला इस्माईल शेख वय २० वर्षे रा चिंतामणी नगर हडपसर पुणे
२. बिलाल इस्माईल शेख वय २१ वर्षे रा सय्यद नगर हडपसर पुणे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी चोरी केल्याचे कबूल करुन सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपीस दि. २३/०८/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्हयातील चोरीस गेलेले १०,०००/- रुपये रोख व ६०,०००/-रुपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण ७०,०००/ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्यांचेकडे अधिक तपास करत त्यांनी विश्रामबाग येथे २०,०००/- रु जबरदस्तीने चोरल्याचे व विश्रांतवाडी येथे ३०,०००/- रु चोरी केल्याचे कबूल केले आहे. आरोपींकडून खालील २ जबरीचोरी व १ चोरी असे एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले असून एकूण ८०,०००/-रुकिंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१. येरवडा पो स्टे गु र नं ५७९/२०२३ भादवि ३९२ ३४
२. विश्रामबाग पो स्टे गु र नं १८३/२०२३ भादवि ३९२ ३४
३. विश्रांतवाडी पो स्टे गु र नं २३५/२०३३ भादवि ३७९ ३४

सदरची कामगिरी शशिकांत बोराटे, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-४, संजय पाटील सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, बाळकृष्ण कदम, वपोनि येरवडा, कांचन जाधव, पोनि गुन्हे, जयदिप गायकवाड, पोनि गुन्हे येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, पोना किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे पोअं अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले यांनी केलेली आहे.

येरवडा कारागृहातील कैद्यांकडे आढळले मोबाईल; गुन्हा दाखल…

येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…

येरवडा हद्दीत गुन्हे करणाऱया टोळीवार मोक्का अंतर्गत कारवाई; पाहा नावे…

येरवडा हद्दीत गुन्हे करणाऱया टोळीवार मोक्का अंतर्गत कारवाई; पाहा नावे…

पुणे शहरातील चिक्यासह त्याच्या दोन साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!