सीमा हैदर करणार राजकारणात प्रवेश? RPI पक्षाकडून…

नवी दिल्ली : पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेली सीमा हैदर ही भारतीय राजकारणात प्रवेश करणार? याबाबत चर्चांणा उधाण आले आहे. शिवाय, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)चे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी सीमाला आपल्या पक्षात सामील करून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

किशोर मासूम यांनी सीमा हैदर हिची तुलना थेट काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी केली. ‘इटलीहून येऊन सोनिया गांधी भारतात राजकारण करू शकतात, पंतप्रधानपदाच्या दावेदार होऊ शकतात, तर पाकिस्तानची सीमा हैदर राजकारणात का येऊ शकत नाही? सीमा हैदर खरोखर निर्दोष असतील, त्या गुप्तहेर असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत आणि त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर प्रदेश महिला विंगच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली जाऊ शकते. सीमा हैदर एक उत्तम वक्त्या आहेत. त्यांनी राजकारणात नशीब आजमवायला हवे’

दरम्यान, किशोर मासूम यांच्या या वक्तव्यामुळे आधीच चर्चेत असलेले सीमा प्रकरण आता आणखी चर्चेत आले आहे. किशोर मासूम हे दयानतपूरचे रहिवासी आहेत. हे गाव राबुपुरापासून जवळच आहे. दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष मोदींच्या NDA आघाडीत असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे केंद्रात दुसऱ्यांदा मंत्रीपदी विराजमान आहेत.

पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…

सीमा हैदर हिला सचिन आवडत नाही तर दुसरीकडे बीडी पिण्याचे व्यसन…

सीमा हैदर आणि सचिन मीनाला ATSने चौकशीसाठी घेतले ताब्यात…

सीमा हैदर बाबत पाकिस्तानी बालमैत्रीणीचा गौप्यस्फोट…

सीमा हैदर प्रियकरासाठी भारतात दाखल अन् पाकमधील मंदिरांत सन्नाटा….

प्रेम! भारतीय महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी गाठले पाकिस्तान…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!